- News
- जिल्हा न्यूज
- वैजापूरमध्ये बोरनारे बंधूंविरुद्ध डॉ. परदेशींनी ठोकले शड्डू!; उमेदवारी अर्ज भरला
वैजापूरमध्ये बोरनारे बंधूंविरुद्ध डॉ. परदेशींनी ठोकले शड्डू!; उमेदवारी अर्ज भरला
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वैजापूर नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या दोन मित्रपक्षांतच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे डॉ. दिनेश परदेशी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दोन दिवसांपूर्वी आ. रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांनी शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. विधानसभा निवडणुकीपासून शिंदे गट आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर बिनसलेले असले तरी, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेमुळे पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाशी दोन हात करताना काळजी घ्यावी लागणार आहे. असे असले तरी नगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांत वातावरण गरमच राहणार हे निश्चित आहे.
डॉ. परदेशी यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्याकडे रविवारी (१६ नोव्हेंबर) दाखल केला. दरम्यान, माजी आमदार दिवंगत आर. एम. वाणी यांचे पूत्र सचिन वाणी यांनी ठाकरे गटाकडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले असून, त्यांचा भाजप प्रवेश १८ नोव्हेंबरला मुंबई येथे होणार असल्याचे डॉ. दिनेश परदेशी यांनी सांगितले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
By City News Desk
Latest News
19 Mar 2026 08:39:01
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च)...

