छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा ७ वा बळी!; सिल्लोड तालुक्‍यातील बनकिन्होळ्यात शेतकऱ्याने गळफास घेतला!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा सातवा बळी गेला आहे. बनकिन्होळा (ता. सिल्लोड) येथील ३२ वर्षीय शेतकरी रामेश्वर पुंडलिक फरकाडे यांनी शेतातील घरात गळफास घेतला. ही घटना सोमवारी (६ ऑक्‍टोबर) दुपारी समोर आली.

अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने रामेश्वर फरकाडे चिंतित होते. यातूनच त्‍यांनी स्वतःच्या शेतातील घरात गळफास घेतला. वडोद बाजार पोलिसांना माहिती मिळताच त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस अंमलदार धनराज खाकरे करत आहेत. दुपारी तहसीलदार सतीश सोनी यांनी बनकिन्होळा येथे येऊन फरकाडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. रामेश्वर फरकाडे यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे.

यापूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रमेश वसंत कळसकर (वय २८, रा.  लोहगाव, ता. पैठण), मधुकर सर्जेराव पळसकर (वय ५४, रा. बकापूर पळशी, ता. छत्रपती संभाजीनगर), गोकुळ सुरेश दणके (वय ३५, रा. चिंचोली नकीब, ता. फुलंब्री), आप्पासाहेब कोंडीराम पळसकर (वय ५५, रा. बकापूर पळशी, ता. छत्रपती संभाजीनगर), रामेश्वर हिरा राठोड (वय २५, रा. धिंगापूर, ता. सोयगाव), सतीश कारभारी निकम (वय ४५, रा. हिंगणा, ता. वैजापूर) या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि त्‍यामुळे कर्ज फेडता येणार नसल्याने आत्‍महत्‍या केल्या आहेत. जिल्ह्यात ७ बळी जाऊनही सरकार आणि प्रशासन मात्र पंचनामे करण्यातच वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software