भरधाव एसटी बसने दुचाकीला उडवले, पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर, पैठण तालुक्यातील घटना 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भरधाव एसटी बसने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वार दाम्पत्याला जोरात धडक दिली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी १२ च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-बीड महामार्गावरील रोहिलागड (ता. पैठण) फाट्यावर घडली. कमल शामराव देवघरे (वय ४८, रा. वरुडी, ता. पैठण) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शामराव आनंदराव देवघरे (वय ५३,दोघे रा. वरुडी, ता. पैठण) असे जखमीचे नाव आहे.

शामराव हे पत्नी कमल यांच्यासह दाभरूळ येथे नातेवाइकांकडे सावडण्याच्या कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी दुचाकीने (क्र. एमएच २० एफबी ३५५८) गेले होते. सावडण्याच्या कार्यक्रमानंतर दुपारी १२ ला ते घरी परत निघाले. रोहिलागड फाट्यावर रस्ता ओलांडताना धाराशिवहून- छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या भरधाव बसने (क्र. एमएच ०९ इएम ९६५८) त्यांना धडक दिली. कमल यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची नोंद पाचोड पोलिसांनी केली आहे. कमल यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सून असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

Latest News

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च)...
मागे न पाहताच रिव्हर्स घेणारा हायवा ठरला १८ वर्षीय मनस्वीचा काळ!; रुग्णालयात वडिलांना डबा घेऊन जात होती, चिकलठाण्याजवळील दुर्दैवी घटना
ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software