फुलंब्रीजवळ भीषण अपघात : टेम्‍पो-कारची समोरासमोर धडक, २ तरुण जागीच ठार, ३ गंभीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : टेम्पोने समोरून जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चुराडा झाला. यात कारमधील २ तरुणांचा जागीच मृत्‍यू तर तिघे गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात फुलंब्री- राजूर रस्‍त्‍यावरील पिंपळगाव गांगदेव शिवारात शुक्रवारी (१२ सप्‍टेंबर) रात्री ११ वाजता घडला.

सतीश केशवराव कोलते (वय २३) आणि आदित्य राजू कोलते (वय २२, दोघेही रा. टाकळी कोलते, ता. फुलंब्री) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत. अक्षय भगवान कोलते (२५, रा. टाकळी कोलते), अजय बबन सोळुंके (वय २५, रा. रिधोरा, ता. फुलंब्री) आणि अन्य एक जण यांचा गंभीर जखमींत समावेश आहे. सर्व जण कारने रात्री फुलंब्रीकडून टाकळी कोलते येथे जात होते.

मोसंबीने भरलेला टेम्पो (क्र. एमएच २१ बीएच १६९७) आणि कारची (क्र. एमएच २० ईवाय ४४५१) समोरासमोर जोरदार धडक झाली. फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी येऊन मदतकार्य केले. अपघातानंतर चालक टेम्पो सोडून पसार झाला. सतीश शेती करीत होता, तर आदित्य अजून शिकत होता. दोघेही अविवाहित होते. आदित्यचे वडील व्यावसायिक ऑडिटर आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Latest News

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गारखेड्यातील इंदिरानगरात शनिवारी...
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software