नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीच्या निधीस मान्यता, छ. संभाजीनगरला दिले १४ कोटी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीसाठी ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता दिली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यासाठी १४ कोटी ५४ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

जून २०२५ सह सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई या निधीतून देण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांप्रती शासन संवेदनशील असून या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी बाधित पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

प्रशासनानेही बाधित अतिवृष्टी, पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे केल्याने बाधित शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या निधीस मान्यता  देण्यात आली. जून २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७१ शेतकऱ्यांच्या ७२.३२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १६.०१ लाख तर सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ हजार ५४८ शेतकऱ्यांच्या ४८९१.०५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ६६५.४१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छ. संभाजीनगर-पुणे ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेला लागूनच रेल्वेमार्ग करण्याचे नियोजन?, १०० किमीचे अंतर होणार कमी

Latest News

छ. संभाजीनगर-पुणे ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेला लागूनच रेल्वेमार्ग करण्याचे नियोजन?, १०० किमीचे अंतर होणार कमी छ. संभाजीनगर-पुणे ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेला लागूनच रेल्वेमार्ग करण्याचे नियोजन?, १०० किमीचे अंतर होणार कमी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेलगतच नागपूर-पुणे रेल्वेमार्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत....
जशास तसे : दुकानदाराने कचरा रस्‍त्‍यावर फेकला, मुख्याधिकाऱ्यांनी तोच कचरा उचलून पुन्हा त्‍याच्या दुकानात आणून टाकला!; वैजापूरमध्ये खळबळ
वास्तुशास्‍त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत
Tech News : चुकूनही गुगलवर सर्च करू नका या ४ गोष्टी अडचणीत सापडाल, तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते...
सुनील पाटील पैठणचे नवे SDPO, अवैध धंदेवाल्यांवर फास आवळणार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software