छत्रपती संभाजीनगरमध्ये कामगार कल्याण कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई होणार!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : माथाडी कामगार कायदा तसेच अन्य कामगार कल्याण कायदे व योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा व याबाबत दर आठवड्याला अहवाल सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, २५ डिसेंबरला दिले.

माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या जिल्हास्तरीय कृती समितीची बैठक  जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हा कामगार अधिकारी सुरेंद्रसिंग राजपूत,  वखर महामंडळाचे अंकुश भाटेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक  के. एस. पवार, कामगार संघटनांचे प्रतिनिधी सुभाष लोमटे, शेख हारुन, संतोष तळेकर आदी उपस्थित होते. कामगारांची विविध आस्थापनांवर निवड होऊन त्यांच्या वेतनावरील लेव्ही कामगार मंडळाकडे वेळेत जमा न करणे, कामगारांच्या नियुक्त्यांसंदर्भात विविध प्रश्न, कामगारांना वेळेवर वेतन न दिल्यास दंड आकारणी करणे अशा विषयांबाबत चर्चा करण्यात आली.

कामगार संघटनांनी यासंदर्भात त्यांचे प्रश्न मांडले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, वखार महामंडळांनीही माथाडी कायद्याप्रमाणे काम करावे. कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन व अन्य लाभ मिळावे यासाठीच मंडळ आहे. कामगारांच्या हिताच्या कायद्याची अंमलबजावणी हेतूपुरस्सर न करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच या कारवाई संदर्भात तसेच कामगारा संघटनांच्या विविध वैध मागण्यांबाबत सरकारी कामगार अधिकारी यांनी दर आठवड्याला अहवाल सादर करावा, असे निर्देशही दिले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Latest News

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गारखेड्यातील इंदिरानगरात शनिवारी...
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software