- News
- सिटी डायरी
- पैठण गेट परिसरातील अतिक्रमित दुकानांवर उद्या चालणार बुलडोझर!
पैठण गेट परिसरातील अतिक्रमित दुकानांवर उद्या चालणार बुलडोझर!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पैठण गेटवरील अतिक्रमित दुकानांवर लवकरच बुलडोझर चालणार आहे. युवकाच्या हत्येनंतर अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या पथकाने गुरुवारी (१३ नोव्हेंबर) मुख्य रस्त्यांचे टोटल स्टेशन सर्वेक्षण पूर्ण केले आहे. उद्या, १५ नोव्हेंबरपासून अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरुवात होणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
पैठण गेटचा परिसर मोबाइल दुकानांचे हब म्हणून ओळखला जातो. हत्येच्या घटनेनंतर कुरैशी समाजबांधवांनी महापालिकेकडे अतिक्रमित दुकानांची तक्रार केली होती. पैठणगेट ते सिल्लेखाना, पैठणगेट ते सब्जी मंडी व पैठणगेट ते खोकडपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांच्या मदतीने आता अतिक्रमणांवर बुलडोझर चालवला जाणार आहे. मुकुंदवाडीत तरुणाची हत्या झाल्यानंतर पोलीस आणि महापालिकेने मिळून शहरात ऐतिहासिक अशी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून ५५०० मालमत्ता जमीनदोस्त करत रस्ते मोकळे केले. आता पैठणगेट येथील एस. एस. मोबाईल शॉपीसमोर सोमवारी (१० नोव्हेंबर) रात्री सव्वा दहाच्या सुमारास शेख परवेज शेख मेहमूद (वय ३६, सब्जीमंडी) याने इमरान अकबर कुरेशी (वय ३३, रा. सिल्लेखाना) याची चाकूने गळा चिरून हत्या केली. परवेजचे दुकान अतिक्रमणात आहे. त्यामुळे कुरैशी समाजाने अतिक्रमित दुकानांचा मुद्दा उचलून धरला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
By City News Desk
Latest News
19 Mar 2026 08:39:01
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च)...

