लग्नाच्या पत्रिकेत शेतकऱ्यांना मदतीसाठी क्यूआर कोड छापला, जमा झालेले ५५ हजार दिले जिल्हाधिकाऱ्यांकडे!; एकबोटे दाम्‍पत्याचा आदर्श... 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुलाच्या लग्नात आहेर न स्विकारता पत्रिकेतच क्युआर कोड देऊन त्याद्वारे रोख स्वरुपात जमा झालेला ५५ हजार रुपयांचा आहेर आज, ११ डिसेंबरला एकबोटे कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहायता निधीत देणगी म्हणून जमा केला. डॉ. अभय व सौ. नंदा या एकबोटे दाम्पत्याने मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केला.

अतिवृष्टीमुळे अरिष्ट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी समाजातील सर्व घटक हे मुख्यमंत्री सहायता निधीत आपले योगदान देत आहेत. डॉ. अभय एकबोटे यांचा मुलगा डॉ. कौशिकचे लग्न डॉ. रेया यांच्याशी ५ डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले. या लग्नाच्या पत्रिकेत विवाह प्रसंगी वधू- वरांना देण्यात येणारा आहेर न स्वीकारण्याबाबत एकबोटे कुटुंबियांनी आपल्या आप्तेष्टांना कळविले होते. तसेच शेतकऱ्यांसाठी मदत देण्यासाठी पत्रिकेतच क्यु आर कोड प्रसिद्ध करण्यात आला. त्याप्रमाणे आप्तेष्टांनी आपली मदत दिली. ती तब्बल ५० हजार रुपये इतकी झाली. त्यात एकबोटे कुटुंबियांनी स्वतःचे ५ हजार रुपये असे ५५ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी स्वामी यांच्याकडे सूपूर्द केले. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते या वेळी उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Latest News

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गारखेड्यातील इंदिरानगरात शनिवारी...
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software