तुला माझ्याकडून ते सुख मिळत नाही. तू बाहेर..., पतीने पत्‍नीच्या बदलवल्या २-३ नोकऱ्या!; ३१ वर्षीय विवाहितेने सिडको पोलिसांना काय सांगितलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पत्‍नीच्या आरोपानुसार शारीरिक सुख देण्यात असमर्थ ठरलेल्या पतीला असुरक्षितेने इतके घेरले आहे, की तिची वेगवेगळ्या मार्गाने मुस्कटदाबी केली. कधी नोकरी सोडायला लावायचा. कधी माहेरावरून पैसे आणण्यास सांगायचा. वैतागलेल्या विवाहितेने भावाला बोलावून घेत माहेरी निघून गेली.. त्‍यानंतर आता पतीने नांदवण्यास नकार दिला आहे. सिडको पोलिसांनी तिच्या पतीसह सासू व नणंदेविरुद्ध छळाचा गुन्हा सोमवारी (२२ एप्रिल) दाखल केला आहे.

अंकिता (नाव बदलले आहे, वय ३१, रा. प्रकाशनगर, मध्यवर्ती बसस्थानकामागे, ह. मु. एन ६ सिडको) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ११ जून २०२३ रोजी अंकिताचे लग्न सागर (नाव बदलले आहे) झाले. लग्न जुळवताना सागर बँकेत रिकव्हरी एजंट असून, त्याला चांगला पगार आहे. स्वतःचे घर आहे, असे सांगितले होते. मात्र लग्नानंतर अंकिता सासरी नांदायला आली तेव्हा लक्षात आले की, सगळे खोटे सांगितले होते. लग्नानंतर पती, सासू यांच्यासोबत अंकिता राहत होती. घराजवळच नणंद राहत होती.

सासरच्यांनी तीन-चार महिने अंकिताला चांगले वागवले. मात्र या काळात पती तिला पत्नीचे सुख देत नव्हता. त्‍यामुळे तिला त्‍याच्याबद्दल संशय आला. नुकतेच लग्न झालेले असल्याने जुळवून घ्यायला वेळ लागेल म्‍हणून तिनेही कुणाला याबाबत सांगितले नाही. डिसेंबर २०२३ मध्ये वाद करून पती जेवताना ताट फेकून द्यायचा. विनाकारण वाद करायचा. जाणीवपूर्वक कपडे व बूट घाण करून जाणीवपूर्वक धुवायला सांगत होता. पतीच्या वागण्याबाबत तिने सासू व नणंदेला सांगितले असता त्यांनी तुझे चारित्र्य चांगले नाही, असे बोलून अंकितालाच अपमानित केले. काही दिवसांनंतर पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुला माझ्याकडून शारीरीक सुख मिळत नाही. तू बाहेर तोंड मारशील, असे बोलून तिला २-३ नोकऱ्या सोडण्यास भाग पाडले. सासू व नणंद छोट्या-छोट्या कारणावरून टोमणे देत असत.

१९ मार्च २०२४ रोजी आई-वडिलांना तिने पती, सासू व नणंद यांच्या वागण्याबाबत सांगितले. त्यांनी सगळ्यांची समजूत घातली. मात्र तरीही त्रास काही कमी झाला नाही. तू घरखर्चासाठी तुझ्या माहेराहून ५० हजार रुपये, असे म्‍हणून घरातून काढून दिले. त्यानंतर पती, सासू व नणंद तिला घ्यायला आले नाही. उलट मार्च २०२५ मध्ये तिला नांदायला येण्यासाठी पतीनेच नोटीस पाठविली. पती १५ मे २०२५ रोजी तिला घेण्यासाठी आला असता ती सासरी नांदायला गेली. २४ जून २०२५ रोजी पती तिला म्हणाला, की तुला जे नवऱ्याकडून सुख द्यायला पाहिजे, ते मी देऊ शकत नाही. तुला माझ्यासोबत रहायचे असेल तर रहा. नाहीतर माझ्या घरातून निघून जा, असे सांगितले. पती, सासू व नणंदेच्या वागण्यात बदल होत नसल्याने तिने भावाला सासरी बोलावून घेत त्याच्यासह माहेरी निघून आली. आता पतीने तिला नांदवायला नेण्यास नकार दिल्याने अखेर तिने सिडको पोलीस ठाण्यात धाव  घेऊन तक्रार दिली आहे. तपास पोलीस अंमलदार भाऊसाहेब जगताप करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

Latest News

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च)...
मागे न पाहताच रिव्हर्स घेणारा हायवा ठरला १८ वर्षीय मनस्वीचा काळ!; रुग्णालयात वडिलांना डबा घेऊन जात होती, चिकलठाण्याजवळील दुर्दैवी घटना
ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software