११ गावगुंडांकडून घेरून माजी सरपंच दादा पठाण यांची निर्घृण हत्या, छत्रपती संभाजीनगरजवळील ओव्हरगावातील थरार, जमिनीच्या वादातून संचारले कौर्य

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील जटवाडा रोडवरील ओव्हरगावमध्ये माजी सरपंच दादा सांडू पठाण (वय ६८) यांची ११ गावगुंडांनी घेरून बुधवारी (१७ डिसेंबर) दुपारी निर्घृण हत्या केली. या हत्‍येप्रकरणी गुरुवारी (१८ डिसेंबर) पहाटेपर्यंत चौघांना अटक करण्यात हर्सूल पोलिसांना यश आले. बाकीचे फरारी आहेत. त्यांचा कसून शोध सुरू आहे. अटक केलेल्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. हत्‍येनंतर मारेकऱ्यांची अनधिकृत दुकाने पाडण्यासाठी गुरुवारी (१८ डिसेंबर) पठाण यांच्या नातेवाइक, मित्रांनी गावात रास्ता रोको केला. पोलिसांनी त्यांची समजूत घातली. त्यानंतर नातेवाइकांनी पठाण यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर दफनविधी पार पडला.

हर्सूल पोलिसांनी दादा पठाण यांचा मुलगा आसेफ (वय ३३, रा. जिल्हा परिषद शाळेजवळ ओव्हरगाव) यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक स्वाती केदार, सहायक पोलीस निरीक्षक सचिन सदाफुले, उपनिरीक्षक गणेश केदार यांनी गुरुवारी पहाटेपर्यंत इम्रान खान मोईन खान पठाण, आफरोज खान गयाज खान पठाण (वय ४२), समीर खान जमीर खान पठाण (वय ३२), उमेर खान जमीर खान पठाण (वय २७) यांच्या मुसक्या आवळल्या. ते दौलताबाद व आसपासच्या परिसरात लपून बसले होते.

बाकीचे मारेकरी जमीर इनायत खॉ पठाण, मोईन इनायत खॉ पठाण, असलम गयाज पठाण उर्फ गुड्डू, फुरकान अजगर पठाण, रामअवतार सागरमल साबू, हैदर गयाज पठाण, मोसीन मोईन पठाण (सर्व रा. ओव्हरगाव) हे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. त्यांचा शोध शहर गुन्हे शाखेसह हसूल पोलिसांच्या पथकाकडून सुरू आहे. ओव्हरगावमधील जिल्हा परिषद शाळेजवळ दादा पठाण यांची हत्या करण्यासह मारेकऱ्यांनी त्यांची मुले अफसर (वय ४०), जुबेर (वय ३८), नातू जुनेद मोईन पठाण, माजेद मोईन पठाण (वय १७), मुलगी तसलीम जावेद पठाण, सून तसलीम अफसर पठाण यांच्यावरही हल्ला चढवला होता. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.

कशामुळे वाद?
घरासमोरच पठाण कुटुंबीयांची शेती आहे. घरापासून काही अंतरावर शाळेजवळील गट नं. १९८ मध्ये त्यांची साडेचार एकर जमीन आहे. याच जमिनीवरून हल्लेखोर आणि पठाण कुटुंबात १९९६ पासून वाद आहे. जमिनीच्या शेजारून एक वाट जाते. सुरुवातीला हल्लेखोरांनी या छोट्या वाटेवरून वाद सुरू केला होता. नंतरच्या काळात थेट पूर्ण जमिनीवरच दावा केला. या जमिनीचा कायदेशीर ताबा दादा पठाण यांच्याकडे आहे. मात्र हल्लेखोर आणि पठाण कुटुंबात यावरून अनेकदा वाद झाले. वेळोवेळी हा हर्सूल पोलिसांतही गेला. मात्र पोलिसांनी तो गांभीर्याने न घेतल्याने बुधवारची घटना घडल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास पठाण यांनी या जमिनीच्या सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी बोलावला होता. त्यावरून हल्लेखोरांनी वाद सुरू केला. ११ जणांनी लाठ्याकाठ्या, रॉड, धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. यात दादा पठाण रक्तबंबाळ होऊन जागीच मरण पावले.
नातेवाइक, मित्रांकडून रास्ता रोको...
दादा पठाण यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचे पठाण यांच्याच घरासमोर फरसाण व मिठाईचे अनधिकृत दुकाने आहेत. ही दोन्ही दुकाने तत्काळ पाडावी, अशी मागणी पठाण यांच्या नातेवाइक, मित्रांनी करत गुरुवारी दुपारी १ वाजता ओव्हरगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. अर्धा तास आंदोलन चालले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी सर्वांची समजूत काढली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software