मामीवर दोन भाच्यांचा बलात्कार, पतीचीही साथ, देवळाई भागातील घटनेने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ३० वर्षीय विवाहितेवर तिच्या दोन भाच्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा परिसरातील देवळाई भागात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अत्याचार करणारा एक भाचा अल्पवयीन असून, दोघांच्या या कृत्‍यात तिचा पतीही सामील असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडितेने नवी मुंबई पोलिसांत तक्रार केली. मात्र घटना चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असल्याने गुन्हा छत्रपती संभाजीनगरला वर्ग करण्यात आला आहे. ५ जुलै २०२४ ते १५ मे २०२५ या काळात वारंवार अत्याचार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीनुसार, मुलीच्या वाढदिवसानिमित्त पतीचे दोन भाचे घरी आले होते. आधी पतीने दारू पाजून विवाहितेसोबत शरीरसंबंध केले. नंतर दोन्ही भाच्यांनी लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन भाच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असताना तिचा व्हिडीओ बनविण्यात आला. त्यानंतर तो व्हिडीओ दाखवून तिघे तिला ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार करत राहिले. आता या घटनेची तक्रार विवाहितेने नवी मुंबई पोलिसांत केली. घटना चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने चिकलटाणा पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. विशेष म्‍हणजे, चिकलठाणा पोलीस ठाण्यातच सप्टेंबर महिन्यात याच विवाहितेविरुद्ध अल्पवयीन भाच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने ‘पोक्‍सो’चा गुन्हा दाखल आहे. ती अल्पवयीन भाच्यासोबत संबंध ठेवत असताना पतीने पाहिले आणि त्यानंतर अल्पवयीन भाच्याने चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर आता विवाहितेने दोन्ही भाच्यांसह पतीविरुद्धही लैंगिक अत्याचाराची तक्रार केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समाधान पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software