हिट ॲन्ड रन : सुसाट कार दुचाकीला उडवून पसार, मायलेक जखमी, सिडको एन ६ मधील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट कारने दुचाकीला उडवले. यात मायलेक जखमी झाले. ही घटना सिडको एन ६ संभाजी कॉलनीच्या कमानीजवळ घडली. १५ डिसेंबरच्या पहाटे एकच्या घटनेची तक्रार मंगळवारी (२३ डिसेंबर) सिडको पोलिसांत करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रुखसाना बेगम इकबाल सिद्दीकी (वय ४१, रा. चिश्तीया कॉलनी गल्ली नं. २, एन ६ सिडको) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. एस. एम. एजन्सी नावाची दुकान त्यांचा मोठा मुलगा शफी सिद्दीकी चालवतो. १४ डिसेंबरला त्या व त्यांचा मुलगा दुचाकीने संध्याकाळी साडेसातला रुखसाना यांच्या बहिणीला भेटण्यासाठी टाऊन हॉल येथे आले. तिथून रात्री पावणेबाराला परतत असताना जेवणाचे पार्सल घेण्यासाठी सीएफसी हॉटेल येथे थांबले.

नंतर घराकडे निघाले असता आझाद चौकापुढे गेल्यावर सिडको एन ६ संभाजी कॉलनीच्या कमानीजवळ त्यांच्या दुचाकीला (MH20 BE9522) मागून येणाऱ्या क्रेटा हुंदाई कारने जोरात धडक दिली. त्यामुळे मायलेक दोघेही पडले. रुखसाना यांच्या कमरेच्या मणक्याला मुका मार लागला, तर शफी यांच्या पायाला खरचटले. दोघांना नातेवाइकांनी एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कारचालक मदतीला न थांबता वाहनासह पळून गेला. अधिक तपास पोलीस अंमलदार शिवाजी भोसले करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

Latest News

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च)...
मागे न पाहताच रिव्हर्स घेणारा हायवा ठरला १८ वर्षीय मनस्वीचा काळ!; रुग्णालयात वडिलांना डबा घेऊन जात होती, चिकलठाण्याजवळील दुर्दैवी घटना
ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software