‘गाडी भाड्याने पाहिजे', पोलिसांनी डाव फेकला, चोरट्यांची टोळी अलगद अडकली!, कुंभेफळच्या चोरीप्रकरणात ५ चोरटे गजाआड, LCB ची कामगिरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : करमाडनजीकच्या कुंभेफळ येथे न्यू श्रीराम इलेक्ट्रिकल दुकान ऐन दिवाळीत गुरुवारी (२३ ऑक्टोबर) फोडून १ लाख ८२ हजार ९०० रुपयांच्या साहित्यावर डल्ला मारणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या चोरीसाठी वापरण्यात आलेल्या गाडीच्या मालकाला फोन करून ‘गाडी भाड्याने पाहिजे', असे सांगत लोकेशन विचारले आणि त्याने लोकेशन सांगताच छापा मारून पाचही चोरट्यांना बेड्या ठोकल्या.

या प्रकरणात दुकानमालक संदीप मुळे यांच्या तक्रारीवरून करमाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. तपासादरम्यान एलसीबीच्या पथकाने आसपास बसवलेल्या १८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यातून चोरट्यांनी चोरीसाठी एमएच १७ बीवाय ८२६० क्रमांकाची पिकअप गाडी वापरल्याचे समोर आले. पोलिसांनी या क्रमांकावरून गाडीमालकाचा नंबर शोधून काढला. यानंतर चलाखीने गाडी मालकाला फोन करून ‘आम्हाला तुमची गाडी भाड्याने पाहिजे, सध्या गाडी कुठे उभी आहे, पहायला मिळेल का', अशी विचारणा त्याच्याकडे केली. गाडी मालकाने तत्काळ गाडी सुंदरवाडी शिवारात उभी आहे, पाहायला येऊ शकता, असे उत्तर दिले.

एलसीबीच्या पथकाने क्षणाचाही विलंब न करता सुंदरवाडी शिवारात जालना रोडवरील साई मंदिराजवळ सापळा रचला आणि पाचही चोरटे अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. मनोज सुनील लिंभोरे (वय २१, रा. प्रवरासंगम टोका, ता. नेवासा), संतोष अशोक जाधव (वय २७, वराह पाली, रा. प्रवरासंगम हायस्कूलच्या मागे, ता. नेवासा), सुहास रामकिसन धोत्रे (२८, रा. प्रवरासंगम, ता. नेवासा), धर्मेंद्र मांजीलाल गुंगले (वय २४, रा. प्रवरासंगम, ता. नेवासा) आणि अजय अनिल गायकवाड (वय १८, रा. रामराई दोर, वाळूज) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरलेला सर्व मुद्देमालही जप्त केला आहे. या टोळीने यापूर्वीही विरगाव, फुलंब्री, वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software