प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा, मुकुंदवाडी भागातील घटना, प्रेयसीचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू झाल्याच्या संशयातून संपवले होते...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रेयसीचा गळा आवळून खून करणाऱ्याला प्रियकराला सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी सोमवारी (१९ जानेवारी) जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड ठोठावला. भोलाकुमार कुंजल मास्टर कुमार (वय २८, रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश ह. मु. स्वराजनगर, मुकुंदवाडी परिसर) असे शिक्षा झालेल्या प्रियकराचे नाव आहे. प्रेयसीचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय त्याला होता. यातूनच त्याने तिला संपवले.

या प्रकरणात राहुल बरखु राय (वय २०, रा. मुकुंदनगर रामकाठीजवळ) याने या प्रकरणात तक्रार दिली होती. तो वडील, मोठा भाऊ, त्याची पत्नी आणि मोठी बहीण इंदू (वय २२) यांच्यासह राहत होता. इंदू उस्मानपुऱ्यातील MI च्या सर्व्हिस सेंटरमध्ये काम करायची. राहुलच्या वडिलांसोबत काम करणारा भोलाकुमार त्यांच्यासोबतच राहत होता. त्याचे व इंदू प्रेमप्रकरण चालू होते. दोघांत वादही होत होते. यातून भोलाकुमारने इंदूचा मोबाइल जाळून टाकला होता. त्यांच्या प्रेमप्रकरणाचे कळल्यावर राय कुटुंबाने भोलाकुमारला दुसरीकडे रूम घेऊन राहायला सांगितले होते. त्यामुळे त्याने स्वराजनगरात रूम किरायाने घेतली. ८ नोव्‍हेंबर २०२१ रोजी सकाळी साडेनऊला इंदू कामाला निघून गेली.

सायंकाळी साडेसातपर्यंतही ती कामावरून घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. राजनगरच्या मोकळ्या मैदानात इंदूचा मृतदेह मिळून आला. तिचा गळा दाबून खून करण्यात आलेला होता. इंदूचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमप्रकरण चालू असल्याच्या संशयातून भोलाकुमारनेच तिची हत्या केल्याचा संशय राहुल रायने तक्रारीत व्यक्त केला होता. पोलिसांनी भोलाकुमारला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच ओढणीने गळा आवळून तिची हत्या केल्यानंतर मृतदेह गुंडाळून मैदानात आणून टाकल्याची कबुली दिली. या प्रकरणात तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी लोकअभियोक्ता अरविंद बागूल यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यातील ३ जणांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने भोलाकुमारला जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त ३ महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागेल, असे आदेशात म्हटले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Latest News

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गारखेड्यातील इंदिरानगरात शनिवारी...
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software