समतानगरातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरातील समतानगरातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या आईने शनिवारी (१८ ऑक्‍टोबर) क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

खासगी नोकरी करणाऱ्या ३३ वर्षीय महिला पती, मुलगा, मुलीसह राहते. त्यांची १७ वर्षांची मुलगी स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये १२ वीत शिकते. शुक्रवारी (१७ ऑक्‍टोबर) सकाळी १० च्या सुमारास त्या नोकरीच्या ठिकाणी गेल्या. घरी मुलगी एकटीच होती. नोकरीवरून त्या दुपारी २ ला घरी आल्या असता मुलगी घरी नव्हती. ती कुठेतरी मैत्रिणीच्या घरी गेली असावी, असे वाटून महिलेने शोधले नाही. सायंकाळी पाचला त्या कामावर निघून गेल्या. रात्री ९ ला परत घरी आल्या असता मुलगी तरीही घरी नव्हती. त्यामुळे घाबरून गेलेल्या महिलेने बाहेर शोधाशोध सुरू केली. नातेवाइक, मैत्रिणींकडेही चौकशी केली. मात्र मुलगी मिळून आली नाही. अखेर क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास शेवाळे करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Latest News

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गारखेड्यातील इंदिरानगरात शनिवारी...
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software