- News
- सिटी क्राईम
- दादा पठाण हत्या प्रकरणात चार मारेकऱ्यांना अटक, ओव्हरगावमध्ये तणाव कायम, नातेवाइक-मित्रांचा रास्ता रो...
दादा पठाण हत्या प्रकरणात चार मारेकऱ्यांना अटक, ओव्हरगावमध्ये तणाव कायम, नातेवाइक-मित्रांचा रास्ता रोको, पोलिसांनी समजूत काढल्यानंतर दफनविधी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील जटवाडा रोडवरील ओव्हरगावमध्ये माजी सरपंच दादा सांडू पठाण (वय ६८) यांची ११ गावगुंडांनी घेरून बुधवारी (१७ डिसेंबर) दुपारी निर्घृण हत्या केली. या हत्येप्रकरणी गुरुवारी (१८ डिसेंबर) पहाटेपर्यंत चौघांना अटक करण्यात हर्सूल पोलिसांना यश आले. बाकीचे फरारी आहेत. त्यांचा कसून शोध सुरू आहे. अटक केलेल्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. हत्येनंतर मारेकऱ्यांची अनधिकृत दुकाने पाडण्यासाठी गुरुवारी (१८ डिसेंबर) पठाण यांच्या नातेवाइक, मित्रांनी गावात रास्ता रोको केला. पोलिसांनी त्यांची समजूत घातली. त्यानंतर नातेवाइकांनी पठाण यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर दफनविधी पार पडला.
घरासमोरच पठाण कुटुंबीयांची शेती आहे. घरापासून काही अंतरावर शाळेजवळील गट नं. १९८ मध्ये त्यांची साडेचार एकर जमीन आहे. याच जमिनीवरून हल्लेखोर आणि पठाण कुटुंबात १९९६ पासून वाद आहे. जमिनीच्या शेजारून एक वाट जाते. सुरुवातीला हल्लेखोरांनी या छोट्या वाटेवरून वाद सुरू केला होता. नंतरच्या काळात थेट पूर्ण जमिनीवरच दावा केला. या जमिनीचा कायदेशीर ताबा दादा पठाण यांच्याकडे आहे. मात्र हल्लेखोर आणि पठाण कुटुंबात यावरून अनेकदा वाद झाले. वेळोवेळी हा हर्सूल पोलिसांतही गेला. मात्र पोलिसांनी तो गांभीर्याने न घेतल्याने बुधवारची घटना घडल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास पठाण यांनी या जमिनीच्या सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी बोलावला होता. त्यावरून हल्लेखोरांनी वाद सुरू केला. ११ जणांनी लाठ्याकाठ्या, रॉड, धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. यात दादा पठाण रक्तबंबाळ होऊन जागीच मरण पावले.
नातेवाइक, मित्रांकडून रास्ता रोको...
दादा पठाण यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचे पठाण यांच्याच घरासमोर फरसाण व मिठाईचे अनधिकृत दुकाने आहेत. ही दोन्ही दुकाने तत्काळ पाडावी, अशी मागणी पठाण यांच्या नातेवाइक, मित्रांनी करत गुरुवारी दुपारी १ वाजता ओव्हरगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. अर्धा तास आंदोलन चालले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी सर्वांची समजूत काढली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
By District Correspondent
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
By District Correspondent
विदेशी नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
By District Correspondent
Latest News
17 Feb 2026 13:14:02
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई

