तिघेही दारू पिऊन टल्ली, दुकानमालकाने दिली स्कुटी, सुसाट जाताना तोल गेला, लोखंडी अँगल शरीराच्या आरपार, एकाचा मृत्यू, दोघे जखमी, क्रांती चौक परिसरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : तिघेही दारू पिलेले, त्यात दुकानमालकाने स्कुटी दिली... स्कुटीवरून सुसाट निघाले आणि क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सम्राट अशोक चौक सर्कलवर स्कुटी धडकवली. यात एका तरुणाच्या लोखंडी अँगल छातीतून आरपार गेले. त्याचा मृत्यू झाला. मागे बसलेले दोघे जखमी झाले. हा भीषण अपघात ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २१ ऑक्‍टोबरला रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.

संदीप मदनराव गोरे (वय २२, रा. जयभवानीनगर राधाकृष्ण शाळेमागे) या तरुणाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो बहीण व भाऊजीसोबत राहतो. जवाहर कॉलनीतील त्रिमूर्ती चौकातील रंगोली कलेक्शनमध्ये काम करतो.  त्याच्यासोबत संदीप गुलाबराव जाधव व शुभम साहेबराव पद्‌मे हेदेखील सुमारे ७ ते ८ वर्षांपासून या दुकानात काम करतात. संदीप गोरे आणि संदीप जाधव हे दोघे मोटारसायकलीने जाधवच्या जयभवानीनगरातील रूमवर आले. तेथे दोघांनी ओल्डमंक रमची बॉटल अर्धी अर्धी पिणे सुरू केले. त्याचवेळी त्यांचा तिसरा मित्र शुभम साहेबराव पद्‌मे हाही आला. त्यानेही सोबत ओल्डमंक रमची बाटली आणली होती. त्याने आणलेली बॉटल तो एकटाच पिला.

त्यानंतर तो म्हणाला, की आज दिवाळी आहे. माझ्या बहिणीकडे भोईवाडा येथे भेटायला जाऊ. त्यामुळे तिघेही त्याच्या चेतक स्कुटीवर बसून जयभवानीनगर येथून त्रिमूर्ती चौकात गेले. तिथे त्याच्या स्कुटीची चार्जिंग कमी झाल्याने तिघेही रंगोली कलेक्शनच्या मालकाकडे गेले. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन तिथे स्कुटी लावून दुकान मालकाची ज्युपीटर स्कुटी घेऊन शुभम पद्‌मे याच्या बहिणीकडे भोईवाडा येथे रात्री साडेनऊला गेले. त्यानंतर शुभम त्याच्या बहिणीला भेटला. त्यावेळी गोरे आणि जाधव बाहेर थांबलो. रात्री १० ला शुभम त्याच्या बहिणीला भेटून बाहेर आला. तिघे परत जयभवानीनगरकडे घरी जाण्यासाठी स्कुटीने निघाले. शुभम पद्‌मे याला संदीप गोरे म्हणाला, की तू जास्त दारू पिलेला आहे. गाडी मी चालवतो. परंतु त्याने गोरे याचे ऐकले नाही. त्यावर तो म्हणाला, की मीच गाडी चालवतो.

त्याने पैठण गेट, सिल्लेखानामार्गे, खोकडपुरा, तारभवनमार्गे स्कुटी चालवली. त्यावेळी पाऊस चालू होता. स्कुटी हळू चालव असे सांगूनही तो ऐकत नव्हता. स्कुटीची स्पीड वाढवून तेथून सम्राट अशोक चौक सर्कल येथे आले असता वळणावर टर्न घेत असताना रात्री अंदाजे साडेदहाच्या सुमारास त्यांच्या स्कुटीचा बॅलेन्स जाऊन गाडी जोरात अशोक चौकातील सर्कलला धडकली. त्यामुळे शुभम पद्‌मे चौकातील अँगलवर जाऊन आदळला. त्यामुळे त्याच्या छातीत लोखंडी अँगल घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. गोरे व जाधव यांनाही उजव्या पायाला व उजव्या हाताला मुक्का मार लागला. शुभम गंभीर जखमी होऊन तसाच पडून होता. अपघात झाल्याचे पाहून काही लोक मदतीला धावून आले. त्यांनी शुभमला लोखंडी अँगलवरून काढून रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचार चालू असताना शुभमचा रात्री ११ ला मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आत्माराम घुगे करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software