‘ऐतखाऊ’ टवाळखोराचा कहर : हॉटेलमालकाच्या डोक्यात लोखंडी रॉडचे वार करून केले गंभीर जखमी, जुन्या मोंढ्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जुन्या मोंढ्यातील न्यू जनता हॉटेलमध्ये येऊन दमदाटी करून फुकट जेवण घेऊन जाणाऱ्या टवाळखोराने शुक्रवारी (२८ नोव्‍हेंबर) रात्री साडेदहाला जेवण दिले नाही म्हणून कहर केला. लोखंडी रॉडचे वार हॉटेलमालकावर करून गंभीर जखमी केले. शेख नाजीम शेख शेरू (वय ४०, रा. इंदिरानगर न्यू बायजीपुरा) असे जखमी हॉटेलमालकाचे नाव असून, त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेख नाजीम यांच्या तक्रारीनुसार, ते आणि त्यांचे चुलतभाऊ शेख नफीस दोघे मिळून जुना मोंढा येथे न्यू जनता हॉटेल चालवतात. हॉटेल सकाळी ११ ला उघडतात व रात्री साडेदहाला बंद करतात. हॉटेलमध्ये मागील काही दिवसांपासून गांधीनगर येथील शिवा चावरिया रात्री येऊन शिवीगाळ करून दमदाटी करून फुकट जेवण घेऊन जातो. शुक्रवारी रात्री साडेदहाला शेख नाजीम व सोबतचे कामगार किरण मोरे, रिजवान अन्सारी हे हॉटेल बंद करत असताना शिवा लाकडी दांडका घेऊन आला. त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन जेवण मागितले.

नाजीमने त्याच्या हातून दांडका काढून घेतला व समजावून परत पाठवून दिले. मात्र थोड्या वेळातच तो परत हातात लोखंडी रॉड घेऊन आला. नाजीम हे त्याला समजावून सांगत असताना शिवाने त्यांना तुला आता जीवेच मारतो, असे म्हणत लोखंडी रॉडने डोक्यात वार केला. डोक्यात दुसरा वार करत असताना नाजीम यांनी डावा हात आडवा केला. त्याने दोन वार करून त्यांचा डावा हात फ्रॅक्चर केला. कपाळावर उजव्या बाजूला व पोटावर डाव्या बाजूस लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर तो पळून गेला. कामगारांनी नाजीम यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. क्रांती चौक पोलिसांनी शिवाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आत्‍माराम घुगे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Latest News

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गारखेड्यातील इंदिरानगरात शनिवारी...
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software