किरकोळ अपघातानंतर स्कॉर्पिओतील चौघांनी युवकाला चाकूने भोसकले!, हडकोतील थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकी आणि स्कॉर्पिओच्या किरकोळ अपघातानंतर स्कॉर्पिओतून चौघांनी तरुणाला मारहाण सुरू केली. त्याच्या मदतीला धावलेल्या दोघांना बेदम मारहाण करत त्यातील एकाला चाकूने पोटात भोसकले. यात तो गंभीर जखमी झाला असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (३१ डिसेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास ठाकरे उद्यान, एन ११ हडको समोरील रोडवर घडली.

सागर भागवत भारसकर (वय २८, रा. सुरेवाडी, जाधववाडी) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्यावर एम्स हॉस्पिटलमधील आयसीयूत उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला. जबाबानुसार, ते व्यापार करून कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. बुधवारी (३१ डिसेंबर) त्यांची काकू वारल्याने ते व त्यांचे मावसभाऊ रोहीत अशोक आढाव हे मोटारसायकलीने गजानन महाराज मंदिर परिसरात गेले होते. काकूचे अंत्यविधी झाल्यानंतर दोघे रात्री ११ ला घरी परतले. रोहीत त्यांची मोटारसायकल घेऊन गेला. त्यानंतर रात्री सव्वा अकराला रोहीतचा कॉल आला. त्याने सांगितले, की माझ्या गाडीचा ठाकरे उद्यान, एन ११ हडको समोरील रोडवर काळ्या स्कॉर्पिओसोबत अपघात झाला असून त्या गाडीतील लोक मला खूप मारहाण करत आहेत.

त्यामुळे सागर हे गल्लीतील विकास घुगे यांच्यासोबत लगेचच ठाकरे उद्यानाकडे आले. तेथे रोहीतला तीन-चार जण हाताचापटाने मारहाण करत होते. सागर आणि विकास हे मारहाण करणाऱ्यांना समजावून सांगत असताना त्यांनी सागर व विकास यांनाही शिवीगाळ करून मारण्याकरिता अंगावर धावून आले. त्यामुळे सागर व विकास हे पळत असताना त्यांनी सागर यांना पकडले. त्यावेळी सागर यांनी मारहाण करणारे श्यामराव कडमिंचे, सुनिल कडमिंचे, भोला कडमिंचे (सर्व रा. इंदिरानगर, सिल्लोड) व म्हस्के (पूर्ण नाव माहीत नाही, रा. सिद्धार्थनगर, छत्रपती संभाजीनगर) असल्याचे ओळखले.

त्यावर सागर म्हणाले, की पैशाचा वाद आपण आपसात बसून मिटवू. त्यावर सुनिल कडमिंचे याने ‘आम्हाला पैसे नको. आज तुला संपवूनच टाकतो’, असे म्हणून त्याच्या कमरेला लावलेला चाकू काढून सागर यांना मानेवर मारण्याचा प्रयत्न केला. तो वार सागर यांनी चुकवला. मात्र पोटाच्या उजव्या बाजूला खोलवर लागला. त्यामुळे रक्तस्‍त्राव होऊन सागर खाली पडले. सागर यांचा मृत्यू झाला, असे समजून मारहाण करणारे स्कॉर्पिओतून पळून गेले. अधिक पोलीस उपनिरीक्षक अनिल नानेकर करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!

Latest News

छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ! छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी-करमाड रस्त्यावर म्हसोबा फाट्याजवळ, मुरुमखेडा शिवारात एक्सलंट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल आहे....
छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software