सिडको चौक ते चिकलठाणा जणू गुन्हेगारांचेच साम्राज्य!; पोलिसांचा धाक फक्त सामान्यांनाच; नशेखोर, लुटारूंची खुलेआम दादागिरी; बघेपणा सोडा, रस्त्यावर उतरा, सामान्यांनी पोलिसांना जोडले हात!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : एखादा पोलीसवाला रस्त्यावर उभा असला तर एकाचीही गुन्हा करण्याची हिंमत होत नाही, हे चित्रपटातील वाक्य छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांना लागू होत नसल्याचे वास्तव विविध घटनांतून समोर आले आहे. विशेषत: सिडको बसस्थानक ते चिकलठाणा रस्त्यावर रात्री आठनंतर सामान्यांना चालणेही कठीण झाले असून, या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या वस्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगार व नशेखोरांची प्रचंड दहशत वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे या गुन्हेगारांचे लागेबांधे असल्याने मुकुंदवाडीसह एमआयडीसी सिडको पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

२१ ऑक्टोबरला ऐन दिवाळीच्या दिवशी रामनगरमध्ये दोन नशेखोरांनी विपुल मधुकर चाबूकस्वार (वय २७, रा. तोरणगडनगर, सिडको) याची छातीत सुरा खुपसून हत्या केली. याच दिवशी मुकुंदवाडी लुटमारीच्या दोन घटना घडल्या. यात एका व्यावसायिकाला मारहाण झाली. त्याच दिवशी एका तरुणीची रामनगरमध्ये छेड काढण्यात आली. या वेळी एका तरुणावर गंभीर वार करण्यात आले. मुकुंदवाडी, रामनगर, संजयनगर, संघर्षनगर, म्हाडा कॉलनी आदी भागांत सातत्याने घडणाऱ्या या घटना परिसरातील वाढती गुंडगिरी, नशेखोरी अधोरेखित करीत आहेत. या घटना घडल्या तो भाग मुकुंदवाडी आणि सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. मात्र, या पोलिसांचे या वाढत्या गुंडगिरीकडे ठरवून दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या काही दिवसांत विठ्ठलनगरमध्ये नशेखोरांनी वाहनांची तोडफोड करून साहित्याची लूट केली. रामनगरमध्ये चाकूहल्ल्याच्या आठ ते दहा घटना घडल्या आहेत. मात्र, या सगळ्या प्रकरणातील हल्लेखोर गुन्हेगार अजूनही पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाहीत. मुकुंदवाडी पोलिसांच्या डीबीतील बहुतांश अधिकारी आणि अंमलदारांचे तर नशेखोर आणि गुन्हेगारांसोबत लागेबांधे असल्याची उघड चर्चा सगळीकडे आहे. पोलीस अंमलदाराला मारहाण करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाऊनही पोलीस काहीही करायला तयार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

नागरिकांनी दोन्ही पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची भेट घेतली अन्‌ हात जोडले!
पोलिसांच्या या वागणुकीवर संताप व्यक्त होत असून आणि दिवाळीत या भागातील स्थानिक नागरिकांवर अखेर दोन्ही पोलीस ठाणे गाठून आता तरी नशेखोर, गुन्हेगारांना आवरावे, असे आर्जव पोलिसांना करण्याची वेळ आली. माजी महापौर बापू घडामोडे, मनोज गांगवे, दीपक खोतकर, सतीश पवार, बळीराम कदम, राहुल सावंत, अशोक पांडे यांच्यासह असंख्य नागरिकांनी दोन्ही ठाण्यांच्या पोलिस प्रमुखांची भेट घेऊन गुन्हेगारीला आवर घालण्याची विनंती केली. अर्थात याला आठ दिवस उलटत आले तरी अद्याप या दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कमी न झाल्याने पोलिसांच्या लेखी सामान्यांच्या अर्जाला कोणतेही महत्त्व नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software