१८ वर्षांच्या दोन तरुणांनी सुसाट स्पोर्ट्‌स बाईकने बुलेटला उडवले, भाजप माजी नगरसेवक वीरकर यांचा मृत्‍यू, चिकलठाणा MIDC तील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपचे गुलमोहर कॉलनी येथील माजी नगरसेवक अशोक गोरखनाथ वीरकर (वय ५५, रा. गुलमोहर कॉलनी) यांच्या बुलेटला सुसाट स्पोर्ट्‌स बाइकने जोरात धडक दिली. यात वीरकर यांचा मृत्‍यू झाला. हा अपघात चिकलठाणा एमआयडीसीतील ब्रँडी कंपनीसमोर गुरुवारी (२० फेब्रुवारी) रात्री १२ च्या सुमारास घडला. स्पोर्ट्‌स बाइकवरील शेख अमान शेख इरफान (वय १८) आणि […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपचे गुलमोहर कॉलनी येथील माजी नगरसेवक अशोक गोरखनाथ वीरकर (वय ५५, रा. गुलमोहर कॉलनी) यांच्या बुलेटला सुसाट स्पोर्ट्‌स बाइकने जोरात धडक दिली. यात वीरकर यांचा मृत्‍यू झाला. हा अपघात चिकलठाणा एमआयडीसीतील ब्रँडी कंपनीसमोर गुरुवारी (२० फेब्रुवारी) रात्री १२ च्या सुमारास घडला.

स्पोर्ट्‌स बाइकवरील शेख अमान शेख इरफान (वय १८) आणि शेख शब्बीर शेख अतिक (वय १८, दोघे रा. पॉवरलूम) गंभीर जखमी झाले. त्‍यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अशोक वीरकर हे बुलेटने (क्र. एमएच २० जीएल २१२२) गुरुवारी सायंकाळी कामानिमित्त चिकलठाणा परिसरात गेले होते. रात्री साडेअकराला घरी परतत असताना सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होते. याचवेळी उत्तरानगरीकडून धूत रुग्णालयाच्या दिशेने यामाहा एफझेड (क्र. एमएच २० एचए ४४६८) या स्पोर्ट्‌स बाइकवरून अमान व शब्बीर सुसाट निघाले होते. त्‍यांनी बुलेटवरील वीरकर यांना जोरात धडक दिली.

कुणीही हेल्मेट घातलेले नव्हते. वीरकर आणि दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अंमलदार समाधान उबाळे, साहेब खान पठाण यांनी तत्‍काळ घटनास्‍थळी येऊन जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र वीरकर यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोन्ही वाहने धडकताच मोठा आवाज झाला. वीरकर दुचाकीसह फेकले गेल्यानंतर त्‍यांचा उजवा हात तीन ठिकाणी तुटला. डोके आणि चेहऱ्याला जबर मार लागला. तपास पोलीस अंमलदार साहेब खान पठाण करत आहेत. वीरकर यांच्या पश्चात आई, पत्‍नी, दोन मुली असा परिवार आहे. घटनेची नोंद सिडको एमआयडीसी पोलिसांनी घेतली असून, अधिक तपास केला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software