डॉ. प्रतीक्षा गवारे सुसाईड केस : पती प्रीतमचे अटकपूर्वसाठी प्रयत्‍न, पोलिसांच्या हाती लागेना, कन्‍नडच्या घराची ५ तास झडती, चुलत भावाचीही कसून चौकशी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २६ वर्षीय एमबीबीएस डॉक्‍टर प्रतीक्षा प्रकाश भुसारे-गवारे हिने शनिवारी (२४ ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास पतीच्या त्रासाला कंटाळून सिडको एन ६ मधील प्रफुल्ल हौसिंग सोसायटीत राहत्या घरी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. पती चारित्र्यावरून संशय घेऊन तिला छळत होता, असे तिने आत्‍महत्‍येपूर्वी लिहिलेल्या चार पानी चिठ्ठीतून समोर आली. सिडको पोलिसांनी या प्रकरणात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २६ वर्षीय एमबीबीएस डॉक्‍टर प्रतीक्षा प्रकाश भुसारे-गवारे हिने शनिवारी (२४ ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास पतीच्या त्रासाला कंटाळून सिडको एन ६ मधील प्रफुल्ल हौसिंग सोसायटीत राहत्या घरी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. पती चारित्र्यावरून संशय घेऊन तिला छळत होता, असे तिने आत्‍महत्‍येपूर्वी लिहिलेल्या चार पानी चिठ्ठीतून समोर आली. सिडको पोलिसांनी या प्रकरणात आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर पती डॉ. प्रीतम शंकर गवारे याचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. कन्‍नड येथील घरीही मंगळवारी (२७ ऑगस्ट) सिडको पोलीस गेले होते. पाच तास त्‍याच्या घराची झडती घेतली. गावातील नातेवाइकांकडेही कसून चौकशी केली. चुलत भावाला काही काळ चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. प्रीतमचे आई-वडीलही घरी नव्हते. पोलीस त्‍याच्या सुपर शॉपीकडे गेले असता, तीही बंद होती.

प्रतीक्षाच्या आत्‍महत्‍येनंतर २४ ऑगस्टला प्रीतम कन्‍नडला होता. काही काळ घरी थांबून तो तिथून पळून गेला. घटनेनंतर प्रीतमने पहिला कॉल त्याच्या चुलत भावाला केला होता. गुन्हा दाखल होण्यापर्यंत तो त्याच्या संपर्कात असल्याचे तांत्रिक तपासात समोर आले. त्‍यामुळे त्‍याची पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केली. प्रीतमने त्याला नेमकी काय माहिती दिली, तो कुठे पसार झाला, त्याला कोणी मदत केली या प्रश्नांचा त्याच्यावर भडीमार केला. प्रीतम अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे. सिडको पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांचे पथक त्याचा शोध घेत आहे.

काय म्‍हटलंय प्रतीक्षाच्‍या वडिलांनी तक्रारीत वाचा…
प्रीतमविरुद्ध प्रतीक्षाचे वडील ॲड. प्रकाश बाबुराव भुसारे (वय ५०, रा. तेहलसिंग हौसिंग सोसायटी, देवानगरी छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ते जिल्हा न्यायालयात वकिली करतात. प्रतीक्षाने २०२२-२३ मध्ये MBBS ची पदवी घेऊन MGM हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून १ ऑगस्टपासून रूजू झाली होती. तिचे लग्न २७ मार्च २०२४ रोजी नात्यातील मुलगा डॉ. प्रीतम शंकर गवारे (रा. करंजखेडा ता. कन्नड) याच्यासोबत हिंदूरितीरिवाजाप्रमाणे दीपक लॉन्स सावंगी छत्रपती संभाजीनगर येथे झाले होते.

प्रीतमने रशिया येथून MBBS चे शिक्षण पूर्ण केले आहे. प्रतीक्षा लग्नापूर्वी करंजखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. लग्नानंतर प्रतीक्षा तिचे पती, सासू, सासरे यांच्यासह सासरी करंजखेडा येथे राहत होती. तेव्हा प्रीतम हा प्रतीक्षा हिच्या मोबाईल क्रमांकावर येणारे फोन, मेसेज यावरून तिच्यासोबत वाद करून चारित्र्यावर संशय घेत होता. तो तिचा मोबाईल हँडसेट तपासत राहायचा. त्याच्या संशयी वृत्तीमुळे प्रीतमने तिच्या मोबाईलचा लॉकसुध्दा स्वतःचा फिंगरप्रिंट ठेवला होता.

प्रतीक्षा कामावर गेल्यावर तो सतत तिला फोन करायचा व फोन न घेतल्यास घरी आल्यावर शिवीगाळ करत होता. तिला तिचा मोबाईल हॅन्डसेट व मोबाईल क्रमांक बदलण्यास सांगत होता. प्रतीक्षा हिने वेळोवेळी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मोबाईल हँडसेट बदलण्यास थोडा वेळ मागितला. प्रतीक्षाच्या वडिलांनीही प्रीतमला समजावून सांगितले होते. मात्र त्याच्या वागणुकीत काही एक बदल झाला नाही. त्यानंतर प्रतीक्षा १ ऑगस्टपासून MGM हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्याने छत्रपती संभाजीनगर येथे राहणे गरजेचे होते. त्यावेळी प्रीतमने घरातील वस्तू खरेदी करण्यासाठी तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये, अशी मागणी केल्याने ॲड. भुसारे यांनी नातेवाईकाकडून १ लाख ६० हजार रुपये घेऊन प्रीतमच्या वडिलांना दिले.

प्रतीक्षा आणि प्रीतम हे दोघे प्रफुल्ल हौसिंग सोसायटी एन ६ सिडको बजरंग चौक छत्रपती संभाजीनगर येथील चौधरी यांच्या घरात ५ ऑगस्टपासून किरायाने राहायला आले. प्रीतम सध्या काही एक व्यवसाय करत नव्हता. करंजखेडा येथे दवाखाना सुरू करण्यासाठी तुझ्या वडिलांकडून पैसे आण, अशी मागणी तो करत होता. रक्षाबंधन सणानंतर प्रतीक्षा घरी पतीकडे गेली होती. २४ ऑगस्टला प्रतीक्षाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. प्रतीक्षाच्या अंत्यविधीवेळीही प्रीतम किंवा सासरकडील कुणीही मंडळी नव्हती.

हेही वाचा : डॉक्‍टर तरुणीने आत्‍महत्‍येपूर्वी लिहिलेल्‍या चिठ्ठीतील मजकूर CSCN च्या हाती; चारित्र्य महिलेचा सर्वात मोठा दागिना असतो अन्‌ तुम्ही नेहमी त्यावरच चिखल फेकला…!…. प्रतीक्षाच्या भावनांचा कोंडमारा चिठ्ठीत व्यक्‍त…मला टाईट हग करूनच चितेवर ठेवा…, फरारी पती आलाच नाही…

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

Latest News

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च)...
मागे न पाहताच रिव्हर्स घेणारा हायवा ठरला १८ वर्षीय मनस्वीचा काळ!; रुग्णालयात वडिलांना डबा घेऊन जात होती, चिकलठाण्याजवळील दुर्दैवी घटना
ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software