छ. संभाजीनगरात सिडकोचा लाचखोर सुरक्षारक्षक दिलीप ढाले ACB च्या जाळ्यात!; तो कुणासाठी लाच घेत होता, हे शोधणे गरजेचे…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जळगाव रोडवरील सिडकोच्या मुख्य कार्यालयातील सुरक्षारक्षक दिलीप रामराव ढाले (वय ५२) याने अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताखाली लाचखोरी सुरू केली. त्‍याच्या लाचेचा ‘मोठा’ वाटा कुणाला जात होता, याचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) घेत आहेत. एसीबीने ढालेला मंगळवारी (१७ जून) दुपारी एक वाजता एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. भूखंड खरेदीची […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जळगाव रोडवरील सिडकोच्या मुख्य कार्यालयातील सुरक्षारक्षक दिलीप रामराव ढाले (वय ५२) याने अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताखाली लाचखोरी सुरू केली. त्‍याच्या लाचेचा ‘मोठा’ वाटा कुणाला जात होता, याचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) घेत आहेत. एसीबीने ढालेला मंगळवारी (१७ जून) दुपारी एक वाजता एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली.

भूखंड खरेदीची नोंदणी व चालान देण्यासाठी त्याने २१ वर्षीय तरुणाकडून लाच घेतली. तरुणाच्या वडिलांनी तिसगावमध्ये सिडकोचा भूखंड खरेदी केला होता. त्याची नोंदणी करून चालान काढण्यासाठी तरुण अनेक दिवसांपासून सिडकोच्या मुख्य कार्यालयात चकरा मारत होता. अखेर अधिकाऱ्यांनी त्याला ‘साहेब’ बनलेल्या ढालेला भेटायला सांगितले. ढाले याने १२ जून रोजी त्याला १ हजार रुपयांची मागणी केली.

तरुणाने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून त्‍याला मंगळवारी अटक केली आहे. ढाले हे सिडकोचा चक्‍क साहेब बनला होता. तो एकमेव असा सुरक्षारक्षक आहे, जो १० वर्षांपेक्षा अधिक काळ मानधनावर सिडको कार्यालयात काम करत आला आहे. अनेक सुरक्षारक्षक बदलले गेले, पण ढाले अधिकाऱ्यांची विशेष मर्जी आढळली. ढालेला स्वतंत्र दालन असून, त्याच्या नावाचे कपाटही होते. त्यात अनेक महत्त्वाच्या फाइल, कागदपत्रे आढळली. भूखंड, चालानच्या कामासाठी अर्जदारांना त्याच्याकडे पाठविले जायचे. त्यामुळे ढाले हा कुणासाठी लाचखोरी करत होता, हे शोधणे गरजेचे बनले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Latest News

इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गारखेड्यातील इंदिरानगरात शनिवारी...
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software