आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल… लव्ह जिहादची बळी ठरलेल्या पूजाच्या कुटुंबीयांना टोळक्‍याने धमकावले!; एकाच आरोपीला अटक, बाकीच्यांना अटकेची तसदी पोलिसांनी न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी रोखला रस्ता!!, छत्रपती संभाजीनगरची घटना, वाचा नक्की पूजासोबत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लव्ह जिहादच्या विकृतीने छळाचा कळस गाठल्याने १७ वर्षीय पूजा शिवराज पवार (रा. ओव्हरगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) हिने विहिरीत उडी घेऊन असह्य त्रास कायमचा संपवला. याप्रकरणात ग्रामस्थ आक्रमक झाल्याने नराधम कासीम यासीन पठाण (वय २१, रा. ओव्हरगाव) याच्यासह त्‍याच्या कुटुंबातील ७ जणांविरुद्ध हर्सूल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र कासीमला अटक केल्यानंतर […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लव्ह जिहादच्या विकृतीने छळाचा कळस गाठल्याने १७ वर्षीय पूजा शिवराज पवार (रा. ओव्हरगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) हिने विहिरीत उडी घेऊन असह्य त्रास कायमचा संपवला. याप्रकरणात ग्रामस्थ आक्रमक झाल्याने नराधम कासीम यासीन पठाण (वय २१, रा. ओव्हरगाव) याच्यासह त्‍याच्या कुटुंबातील ७ जणांविरुद्ध हर्सूल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र कासीमला अटक केल्यानंतर अन्य आरोपींना अटक करण्याची तसदी घेतली नाही. त्‍यामुळे आता त्‍याच्या कुटुंबीयांकडून पूजाच्या कुटुंबावर दबाव आणला जात आहे. सोमवारी (१९ ऑगस्ट) एका टोळक्‍याने पूजाच्या घरासमोर येत हातात चाकू, तलवारी नाचवत ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’ असे म्‍हणत धमकी दिली. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी ओहर-काटशेवरी फाटा-खुलताबाद रस्ता रोखून धरला. पूजाच्या आत्‍महत्‍या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. मंगळवारी (२० ऑगस्ट) सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत आंदोलन चालले, वाहनांच्या रांगा लागल्या. माजी उपमहापौर विजय औताडे व विविध संघटनांचे पदाधिकारीही आंदोलनात सहभागी होते. हर्सूल पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी ग्रामस्थांची समजूत काढत आरोपींना लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

आरोपींना का मिळतेय ढिल?
पूजाच्या आत्‍महत्‍येनंतर सध्या नातेवाइक सांत्‍वनासाठी येत आहेत. ते गेल्यावर आरोपींकडून आमच्यावर हल्ला केला जाईल, अशी भीती पूजाच्या कुटुंबीयांना आहे. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्ती आहेत. ते धमक्या देऊन गेल्याने पूजाच्या शेतवस्तीवर राहणाऱ्या कुटुंबीयांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूजा अल्पवयीन आहे. प्रकरण लैंगिक छळाचे आहे, तरीही या प्रकरणात पोक्‍सोचे कलम लावण्यात आलेले नाही. तपास पोलीस हवालदार शकील समद शेख करत आहेत. आरोपींना ढिल का मिळतेय, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

पूजाला डॉक्‍टर व्हायचे होते…
या प्रकरणात पूजाचे वडील शिवराज साहेबराव पवार (वय ४०) रा. ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुख्य आरोपी कासीम यासीन पठाण (वय २१) व त्याच्या यासीन सुभान पठाण, गफ्फार सुभान पठाण, जब्बार गफ्फार पठाण, राजू यासीन पठाण, ईरफान हारुण पठाण, हारुण सुभान पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा नीटची तयारी करत होती. तिला डॉक्‍टर व्हायचे होते. शिवराज पवार शेती करतात. गावातील कासीम पठाण एक वर्षापासून पूजाशी तिची इच्छा नसताना बोलण्याचा प्रयत्न करत होता. पूजाने घरी वेळोवेळी सांगितल्यावर पवार कुटुंबीयांनी त्‍याला समजावलेही होते. पूजा एका खासगी क्लासेसमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे NEET ची तयारी करत होती. १७ ऑगस्टला रक्षाबंधन सणासाठी घरी आलेली होती.

कोकणवाडीतील होस्टेलबाहेर येऊन तिच्या हालचालींवर लक्ष…
१८ ऑगस्टला सकाळी ९ वाजता पूजाने आईला रडत सांगितले, की गावातील कासीम पठाण व त्याच्या घरचे लोक काही दिवसांपासून ती राहत असलेल्या कोकणवाडी येथील होस्टेलबाहेर येऊन तिच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. मोबाईलवर कासीम पठाण हा फोन करून भेटण्यासाठी ये. नाहीतर मी व माझ्या घरचे तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशा धमक्या देत आहेत. त्यामुळे मला खूप भीती वाटत आहे, मला आता जगण्याची इच्छा राहिली नाही, असे पूजाने सांगितले. त्यानंतर आई, वडील, भाऊ व आजीने पूजाला खूप समजावुन सांगितले. पण तिच्या मनातील भीती जात नव्हती. ती खूप घाबरलेली होती. सकाळी ११ वाजता ते सर्व जेवण करण्याकरिता बसणार असल्याने पूजाला आवाज दिला असता ती घरात दिसून आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोध सुरू केला. घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीकडे जाऊन पाहिले असता विहिरीचे पाणी जास्त खाली वर होत असल्याने पूजाने विहिरीत तर उडी घेतली नाही या भीतीने आईच्या काळजात धस्स झाले. तिने मोठ्याने आराडाओरडा केला लोक जमले. दोघा- तिघांनी विहिरीत उडी घेऊन पूजाचा शोध घेतला. त्यांना ती मिळून आली नाही. अग्‍निशामक दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी पूजाचा विहिरीत शोध घेतला असता पूजाचा मृतदेह मिळून आला. तिला घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. कासीम व त्‍याच्या घरच्यांच्या त्रासाला कंटाळूनच पूजानेच आत्‍महत्‍या केल्याचे तक्रारीत शिवराज पवार यांनी म्‍हटले आहे.

लव्ह जिहादची मानसिकता…
पूजाचे स्वप्न डॉक्‍टर व्हायचे होते. त्‍यासाठी ती नीटची तयारी करत होती. कासीमने बरोबर तिला हेरले. त्‍याने तिला लव्ह जिहाद जाळ्यात अडकविण्याचा आटोकाट प्रयत्‍न केला. मात्र शेतकरी कुटुंबातील पूजाचे संस्कार आड आले. ती त्‍याच्या जाळ्यात अडकली नाही. त्‍यामुळे संताप अनावर झालेल्या कासीमने तिच्या हालचालींवर नजर ठेवण्यापासून मोबाइलवर कॉल करून त्रास देण्यापर्यंत, तिला गाठून प्रेम कर नाहीतर तुझ्या कुटुंबीयांना ठार मारेल, अशा धमक्या द्यायला सुरुवात केल्याने पूजा हादरून गेली होती. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाचे काही बरेवाईट होऊ शकते, ही भीती तिच्या मनात बसली. यातूनच तिने स्वतः प्राणत्‍याग केल्याचे एकूण चित्र समोर येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेण्याची गरज असून, सर्व आरोपींना अटक करण्याची गरज आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

Latest News

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!! शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...
आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software