नववर्ष साजरे करायला प्रेयसीने प्रियकराला घरी बोलावले... समोर उभे केले, वर बघ म्हणाली अन्‌ चाकूने कापले गुप्तांग...!, मुंबईची धक्कादायक बातमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

मुंबई (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २५ वर्षीय तरुणीने केलेल्या कृत्‍याने मुंबई पोलीस चकीत झाले आहेत. तिने तिच्या ४४ वर्षीय प्रियकराला नववर्ष साजरे करण्यासाठी घरी बोलावले. त्याला समोर उभे केले. वर बघायला सांगितले अन्‌ भाजी कापण्याच्या चाकूने त्याचे गुप्तांगच कापून टाकले. हे तिने कशामुळे केले, त्यामागची कहानीही तितकीच धक्कादायक आहे. ही खळबळजनक घटना मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलिना सांताक्रुझ पूर्व भागात १ जानेवारीला पहाटे दीडच्या सुमारास घडली.

व्यवसायाने चालक असलेला ४४ वर्षीय दीपक (नाव बदलेले आहे) मुंबईतील कलिना सांताक्रुझ पूर्व भागात राहतो. तो खासगी कार चालवतो. त्याच्या बहिणीची नणंद काजल (वय २५, नाव बदलले आहे) हीदेखील तिच्या दोन मुलांसोबत दीपकच्याच घराच्या परिसरात राहते. तिचे आणि दीपकचे सहा-सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघे एकमेकांच्या संपर्कात असायचे. बायकोला सोडून तिच्यासोबत राहण्यासाठी काजल त्याच्याकडे हट्ट करत होती. तिच्यासोबत राहण्यास जबरदस्ती करत होती. त्यामुळे दीपक आणि काजलचे भांडण होऊ लागल्याने तो नोव्हेंबरमध्ये राहत्या गावी बिहारला निघून गेला होता. तिच्याशी फोनवर बोलत नव्हता.

काजल त्याला वारंवार फोन करून मुंबईला येण्यासाठी व तिच्यासोबत लग्न करण्यासाठी धमकावत होती. नाहीतर मी तुला सोडणार नाही, अशी धमकी तिने दिली होती. १९ डिसेंबरला दीपक मुंबईला आला. त्यानंतरही तो तिच्यासोबत बोलत नव्हता. मात्र २४ डिसेंबरला काजल त्याला भेटली. का भेटत नाही, असे विचारले. त्यावर दीपकने तिला समजावून सांगितले, की आपल्याला दोन- दोन मुले आहेत. तरीही ती ऐकण्यास तयार नव्हती. १ जानेवारीला मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास दीपक कामावरून घरी येत असताना काजलने तिला कॉल केला.

त्याच्याशी प्रेमाने बोलून नवीन वर्ष आहे. मी तुझ्यासाठी मिठाई आणली आहे, असे सांगून घरी बोलावले. दीपक तिच्या घरी गेला. घरी जाताच तिने त्याला पाणी दिले. तेव्हा तिची मुले झोपलेली होती. त्यानंतर काजलने त्याला उभे करून पॅन्ट काढायला सांगून वर बघायला सांगितले अन्‌ भाजी कापण्याचा चाकूने गुप्तांग कापले. दीपक वेदनेने कळवळून ओरडला अन्‌ तिथून पळून जाऊ लागला. प्रचंड रक्तश्राव होऊ लागल्याने धावत घरी आला. त्याच्या मित्रांनी त्याला व्ही. एन. देसाई हॉस्पिटल व नंतर सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वाकोला पोलिसांनी काजलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software