- News
- पॉलिटिक्स
- व्हिडीओ : दिलेले पैसे तर घ्याच, पण गाडीत असलेले पैसेही घेऊन पळा... ‘वंचित’चे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहे...
व्हिडीओ : दिलेले पैसे तर घ्याच, पण गाडीत असलेले पैसेही घेऊन पळा... ‘वंचित’चे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये आवाहन
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या पैसे आणि वस्तू वाटप करून मते विकत घेण्याचे प्रयत्न धनदांडग्या उमेदवारांकडून सुरू आहेत. गल्लोगल्लीत सध्या या उमेदवारांचे प्रतिनिधी फिरत असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अफलातून पर्याय सूचवला आहे. १२ तारखेपासून मतदानासाठी पैसे मिळतील. ते पैसे तर घ्याच, त्याशिवाय गाडीत असलेले सर्व पैसे घेऊन पळा. पोलीस तुम्हाला काहीही करणार नाहीत. कारण जो तक्रार करायला जाईल तर त्याला पैसे कुठून आले हे सांगावे लागेल. कारण हे पैसे तुमच्या आमच्यासारख्यांकडून ओरबाडलेले आहेत. ते आपलेच पैसे आहेत. पैसा घेतला तरी मतदान आपल्याच माणसाला करा, असे आवाहन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.

