एम. के. देशमुखांच्या भाजप प्रवेशाने डॉ. कराड, शितोळे नाराज?, शिक्षक मतदारसंघात उमेदवारी देणार असल्याच्या चर्चेने इच्‍छुकांच्या पोटात गोळा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जुन्या कार्यकर्त्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका, या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत एम. के. देशमुख यांना  मंत्री अतुल सावे व आ. संजय केणेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. ज्यांना विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन काही निष्कर्ष समोर आल्यानंतर उमेदवारी परत घेतली होती. त्यांना शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून पुढे करण्यासाठी मंत्री सावे व आ. केणेकरांची घाई असल्याचे दिसून येत असल्याने शहरातील वरिष्ठ पदाधिकारी सध्या कमालीचे नाराज असल्याची चर्चा आहे. 

सावे, केणेकरांचा निर्णय डॉ. भागवत कराड आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या पचनी पडला नसल्याचे दिसत आहे. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना ‘मी कुणावरही नाराज नाही', असे डॉ. भागवत कराड म्हणाले. पण याचवेळी शितोळे यांनी मात्र नाराज असल्याचे जाहीर कसे सांगणार, असे पत्रकारांना सांगून एका अर्थाने देशमुख यांची पक्षातील एंट्री पटली नसल्याचे बोलून दाखवले. सावे आणि केणेकर देखील सध्या या विषयावर सारवासारव करत असून, देशमुखांना पक्षात घेताना उमेदवारीचे आश्वासन दिलेले नाही, असे सांगत ‘पदवीधर'च्या इच्छुकांची नाराजी वाढणार नाही, याची काळजी घेताना दिसत आहेत. शिक्षक मतदारसंघात भाजपने तीन वेळा ब्राह्मण उमेदवार दिला. मात्र तिन्ही वेळा पराभव झाला. यावेळी मराठा उमेदवाराला संधी देण्याची रणनिती पक्ष आखत असल्याची चर्चा आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software