- News
- पॉलिटिक्स
- रामगिरी महाराजांना झेड प्लस सिक्युरिटी द्या, त्यांचा जीव धोक्यात!; इम्तियाज जलील यांचा इशारा, रामगि...
रामगिरी महाराजांना झेड प्लस सिक्युरिटी द्या, त्यांचा जीव धोक्यात!; इम्तियाज जलील यांचा इशारा, रामगिरी महाराजांविरुद्ध कारवाईसाठी सरकारला ५ दिवसांचा अल्टिमेटम
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रामगिरी महाराजांचा जीव धोक्यात असल्याचा इशारा देत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने त्यांना झेड प्लस सिक्युसिटी द्यावी, असे आवाहन केले. हे आम्ही नाही तर ज्यांच्या सांगण्यावरून तुम्ही मुस्लिम धर्म आणि धर्मगुरूंबद्दल बोलले तेच लोक तुमच्या जिवाशी खेळायला मागेपुढे पाहणार नाही आणि आमचे नाव पुढे करतील, असे जलील म्हणाले. सत्तेसाठी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रामगिरी महाराजांचा जीव धोक्यात असल्याचा इशारा देत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने त्यांना झेड प्लस सिक्युसिटी द्यावी, असे आवाहन केले. हे आम्ही नाही तर ज्यांच्या सांगण्यावरून तुम्ही मुस्लिम धर्म आणि धर्मगुरूंबद्दल बोलले तेच लोक तुमच्या जिवाशी खेळायला मागेपुढे पाहणार नाही आणि आमचे नाव पुढे करतील, असे जलील म्हणाले. सत्तेसाठी हे लोक काहीही करू शकतात, असे जलील म्हणाले. एकूणच जलील यांच्या इशाऱ्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. रामगिरी महाराजांविरुद्ध ५८ एफआयआर दाखल होऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही. मुख्यमंत्री उलट बोलतात की रामगिरी महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. त्यामुळे आम्ही सरकारला ५ दिवसांचा वेळ रामगिरी महाराजांवर कारवाई करण्यासाठी देत आहोत. सहाव्या दिवशी आम्ही मुंबईकडे कूच करू. राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी गाड्या तयार करून ठेवा. मुंबईला जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देऊ. पोलिसांना त्यांनी जेव्हा पदाची शपथ घेतली त्या शपथेची प्रत देऊ, असे जलील म्हणाले.
पोलीस कारवाई करत नाही, सरकार दखल घेत नाही. त्यामुळे आम्ही मुंबई उच्च न्यायालयात गेलो. तेव्हा न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले, की सायबर पोलिसांची मदत घेऊन रामगिरी महाराजांचे तो व्हिडीओ इंटरनेटवरून हटवा. आम्ही न्यायालयाला सांगितले की पोलीस कारवाई करत नाहीत. वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. त्यावर न्यायालय म्हणाले, की तुम्ही आमच्यावर दबाव टाकू शकत नाही, असे जलील यांनी सांगितले.
सत्तेत बसलेल्यांना खुर्ची टिकविण्यासाठी दंगल घडवायची आहे. त्यासाठी त्यांनी रामगिरी महाराज, राणे चिल्लूपिल्लू मार्केटमध्ये काहीही बोलायला सोडले आहे. आम्ही आता गप्प बसणार नाही. ५ दिवसांचा वेळ सरकारला देत आहे, असे जलील म्हणाले.
विधानसभा स्वतंत्र लढणार
महाविकास आघाडीला आम्ही प्रस्ताव दिला होता. एकत्र यायला तयार आहे. याबाबत त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यांनी वेळ मागितला होता. मात्र आता खूप वेळ झाला आहे….त्यामुळे आमचे नेते असदुद्दीन ओवेसी ८ सप्टेंबरला येणार असून, आम्ही उमेदवार देण्याबाबत निर्णय घेणार आहोत, असे इम्तियाज जलील म्हणाले. त्यानंतर महाविकास आघाडीने म्हणू नाही की आमच्यामुळे मतविभाजन झाले आणि उमेदवार पडला, असेही जलील म्हणाले.

