छ. संभाजीनगरात ॲड. प्रकाश आंबेडकरांचे ओबीसींना आवाहन; आरक्षणाची लढाई रस्त्यावर नव्हे, मते-डोक्याने लढा; शंभर आमदार निवडून आणा, आरक्षण वाचवा…, भव्य दिव्य सभेत कडाडले, म्हणाले, गावागावातील दडपशाही माझ्यामुळे थांबली!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आरक्षणाची लढाई रस्त्यावर नव्हे, तर विधानसभेत लढली गेली पाहिजे. मतांनी, डोक्याने लढली गेली पाहिजे. मराठा समाजाचे २२५ आमदार निवडून आणायचे घोषित केले आहेच, ओबीसींनी आता हे ठरवायची वेळ आली की, हे आरक्षण वाचवायचे की नाही… त्यांना आरक्षण वाचवणाऱ्या पक्षाबरोबर राहावे लागेल. शंभर आमदार निवडून आणा आणि आरक्षण वाचवा, असे आवाहन […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आरक्षणाची लढाई रस्त्यावर नव्हे, तर विधानसभेत लढली गेली पाहिजे. मतांनी, डोक्याने लढली गेली पाहिजे. मराठा समाजाचे २२५ आमदार निवडून आणायचे घोषित केले आहेच, ओबीसींनी आता हे ठरवायची वेळ आली की, हे आरक्षण वाचवायचे की नाही… त्यांना आरक्षण वाचवणाऱ्या पक्षाबरोबर राहावे लागेल. शंभर आमदार निवडून आणा आणि आरक्षण वाचवा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी बुधवारी (७ ऑगस्ट) केले.

ॲड. आंबेडकर यांनी राज्‍यात काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेचा समारोप छत्रपती संभाजीनगरातील आमखास मैदानावर आयोजित जाहीर सभेने झाला. यावेळी ॲड. आंबेडकर म्हणाले, की गावागावात दडपशाही सुरू होती. आम्ही आरक्षण बचाव यात्रा सुरू केल्यामुळे ही दडपशाही थांबली. आपल्यालाही कुणाचा तरी आधार आहे, हा ओबीसींचा विश्वास वाढला. ओबीसींना घालून पाडून बोलले जात होते. ते आता थांबले, असा दावा करत ॲड. आंबेडकर म्हणाले, की ही यात्रा चालू ठेवा. आमचे काम हलके झाले आहे. यात्रेमुळे शांतता निर्माण होत आहे, असे अनेक पोलिसांचे फोन मला येत होते, असे ते म्हणाले. तयारीसाठी आम्हाला वेळ मिळू नये, म्हणून विधानसभा निवडणुका कदाचित नोव्हेंबरऐवजी दिवाळीआधी होतील, असे भाकितही ॲड. आंबेडकर यांनी वर्तवून छगन भुजबळ, शरद पवार यांना आम्ही यात्रेचे निमंत्रण दिले होते, पण ते आले नाहीत, याबद्दल खंत व्यक्त केली.

आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे. पण ते भांडण राजकीय झालंय. त्यामुळे ओबीसींनी सतर्क राहावे. मनोज जरांगे यांना भेटलो तेव्हाही आणि आजही माझा पाठिंबा त्‍यांच्या मागणीला नाही. कारण ती पूर्ण होऊ शकत नाही. जरांगे राजकारणात आले तर क्रांती होईल. प्रस्थापित मराठ्यांच्या विळख्यातून महाराष्ट्र सुटेल, असे आंबेडकर म्हणाले.

यावेळी पुष्पा उमाळे या वृद्धेने तिच्या पेन्शनमधून जमा केलेल्या २५ हजार रुपयांचा धनादेश ॲड. आंबेडकर यांना सुपूर्द करण्यात आला. ओबीसींचे तारणहार प्रकाश आंबेडकर असे होर्डिंग्ज सर्वत्र झळकत होते. सभेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, सुजात आंबेडकर, नवनाथ वाघमारे, उत्कर्षा रुपवते, फारुक अहमद, रमेश बारसकर, अविनाश भोसीकर, गोविंद दळवी, प्रियदर्शी तेलंग, मोहन राठोड, नागोराव पांचाळ, नीलेश विश्वकर्मा आदींची भाषणे झाली. सिद्धार्थ मोकळे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश बन यांनी आभार मानले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software