Exclusive : छत्रपती संभाजीनगरातून टेरर फंडिंग?; युद्धग्रस्तांच्या मदतीसाठीचा दावा करून अनधिकृत १० लाख रुपये जमा करून एकाने पाठवले बाहेर देशात!; ATS पाळेमुळे खोदण्यात व्यस्त

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नवी दिल्लीतील कार बॉम्बस्फोटामुळे देश हादरून गेला आहे. हा दहशतवादी हल्ला होता, हे समोर आल्यानंतर तपास यंत्रणा अधिक अलर्ट झाल्या असून, वेगवेगळ्या पातळीवर टेटर फंडिंगच्या लिंक शोधणे सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एटीएसच्या चौकशीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सय्यद बाबर अली सय्यद मेहमूद अली उर्फ सय्यद बाबर अली रजवी कादरी (रा. बदाम गल्ली, किराडपुरा छत्रपती संभाजीनगर) नावाच्या व्यक्तीने युद्धग्रस्तांसाठी मदतीसाठी अनधिकृत निधी जमा करून १० लाख रुपये बाहेर देशात पाठवले आहेत. त्याने हा निधी नक्की कोणाला पाठवला, त्या निधीचे पुढे काय झाले याचा कसून तपास सुरू आहे. युद्धग्रस्तांना मदतीच्या नावाखाली टेरर फंडिंगचा दाट संशय निर्माण झाला आहे.

दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस अंमलदार योगेश सावंत यांच्या तक्रारीवरून सिटी पोलिसांनी सय्यद बाबरविरुद्ध बुधवारी (१२ नोव्हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठांच्या आदेशाने छत्रपती संभाजीनगरचे एटीएस पथक जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांची माहिती राष्ट्रीय सुरक्षेच्या हेतूने वारंवार घेत असतात. ६ ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगर शहरातील इमाम अहेमद रजा फाऊंडेशन, औरंगाबाद पत्ता : शॉप नं. ४, मेट्रो अपार्टमेंट, चंपा चौक, शहाबाजार, औरंगाबाद ही संस्था फिलिस्तीन या देशातील युध्दाने प्रभावित झालेल्या नागरिकांकरिता लोकांकडून समाजमाध्यमांवर क्यूआर कोड प्रसारित करून निधी गोळा करत असल्याचे एटीएसला कळाले.

त्यामुळे एटीएसने या संस्थेच्या नोंदणीची माहिती काढली असता धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदच नव्हती. या संस्थेने प्रसारित केलेल्या क्यूआर कोडवरील मोबाइल क्रमांक हे सय्यद बाबर अली सय्यद मेहमूद अली उर्फ सय्यद बाबर अली रजवी कादरी (रा. बदाम गल्ली, किराडपुरा छत्रपती संभाजीनगर) हा वापरत असल्याचे एटीएसला कळले. सय्यद बाबर अली हा रजा एम्पॉवरमेंट फाऊंडेशन, औरंगाबाद नावाची संस्थादेखील चालवतो. या संस्थेला कंपनीचे रजिस्ट्रेशन असल्याचे आढळले. या कंपनी कार्यालयाचा पत्तासुद्धा सारख्याच ठिकाणी (शॉप नं. ४, मेट्रो अपार्टमेंट, चंपा चौक) आढळले. रजा एम्पॉवरमेंट फाऊंडेशनची यु ट्यूब चॅनल लिंक एटीएसला आढळली.

त्यावर फाऊंडेशन हे लोकांना फिलिस्तीन या देशातील युध्दाने प्रभावित झालेल्या नागरिकांची मदत करत असल्याबाबतचे व्हिडीओ दिसले. व्हिडीओत सय्यद बाबर अली याच्या नावाचे पॉम्प्लेट्‌स व बॅनर दिसले. इमाम अहेमद रजा फाऊंडेशन व रजा एम्पॉवरमेंट फाऊंडेशन हे सोशल मीडियाद्वारे पॅलेस्टाईन व गाझामधील मदत कार्यांना पाठिंबा देण्याचा दावा करून निधी उभारत असल्याचे एटीएसच्या समोर आले. इमाम अहेमद रजा फाऊंडेशन कायदेशीर नोंदणीकृत नाही. रजा एम्पॉवरमेंट फाऊंडेशन ही नोंदणीकृत कंपनी आहे. या कंपनीच्या उद्देशात निधी उभारून परदेशात पाठविण्याबाबत कुठेही नमूद नाही. तरीही पॅलेस्टाईन व गाझाला मदत करण्याच्या नावाने पैसे जमा करून निधी संस्थेच्या अधिकृत बँक खात्यात न घेता देणगीदारांची फसवणूक तर सय्यद बाबर अलीने केल्याचे दिसून आले.

देणगीदारांचे पैसे त्याच्या वैयक्तीत खात्यात जमा होत होते. त्याचे बँक खाते ॲक्सीस बँकेत आहे. या खात्यात ४ जुलै २०२४ ते ६ ऑक्‍टोबर २०२५ या काळात ९० लाख ९९ हजार ८९३ रुपये जमा झाले, तर ९० लाख ९९ हजार ६४५ रुपये खात्यातून काढल्याचे दिसत आहे. बँक खात्यामधून GOFUNDME.COM या पोर्टलवर १४ ट्रान्‍झेक्शनद्वारे १० लाख २४ हजार २२० रुपये परदेशात पाठविल्याचे दिसून आले. सय्यद बाबरच्या दोन्ही संस्थांना बाहेर देशात आर्थिक निधी पाठविण्याची कोणतीही परवानगी नसताना तो हे काम करत होता.  त्यासाठी सोशल मीडियावर पॅलेस्टाईन व गाझामधील मदत कार्यांना पाठिंबा देण्याचा दावा करत होता. पोलिसांनी अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  संभाजी पवार करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software