करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं बॉयफ्रेंडसोबत लग्न

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

‘बिग बॉस १८’ चा विजेता करण वीर मेहराच्या वैयक्तिक आयुष्याची खूप चर्चा होत असते. त्‍याचे दोन लग्न झाले. दोन्ही वेळा घटस्फोट झाला. आता त्याच्या दुसऱ्या बायकोने प्रियकरासोबत दुसरं लग्न केलं आहे. निधी सेठने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. घटस्फोट घेतल्यानंतर निधी पुन्हा प्रेमात पडली होती. तिने अगदी साधेपणाने बंगळुरू […]

‘बिग बॉस १८’ चा विजेता करण वीर मेहराच्या वैयक्तिक आयुष्याची खूप चर्चा होत असते. त्‍याचे दोन लग्न झाले. दोन्ही वेळा घटस्फोट झाला. आता त्याच्या दुसऱ्या बायकोने प्रियकरासोबत दुसरं लग्न केलं आहे. निधी सेठने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

घटस्फोट घेतल्यानंतर निधी पुन्हा प्रेमात पडली होती. तिने अगदी साधेपणाने बंगळुरू येथील मंदिरात लग्‍न केले. निधीच्या पतीचे नाव संदीप कुमार आहे. तिचा लग्नाचा लूक खूपच साधा होता. गुलाबी रंगाची बनारसी साडी व सोन्याच्या दागिन्यांत ती दिसली. तिच्या नव्या पतीने निळ्या रंगाचा फ्लोरल कुर्ता पायजमा घातला होता. निधीने दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितले, की प्रेम हा संघर्ष नसून एक सुंदर प्रवास आहे, हे संदीपने मला सांगितलं. ‘मी’ पेक्षा तो ‘आम्ही’ला जास्त महत्त्व देतो. आमचं नातं दिवसेंदिवस जास्त मजबूत होईल, असा मला विश्वास आहे. दोन वर्षांपासून त्याने माझ्या प्रत्येक आनंदात आणि आव्हानात साथ दिली. त्याचा पाठिंबा, दयाळूपणा आणि आमच्यातील सुंदर नात्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझा आधार बनल्याबद्दल, मला होय बोलल्याबद्दल आणि माझे जीवन प्रेमाने भरल्याबद्दल धन्यवाद. आय लव्ह यू एस.के. असे तिने म्हटले आहे.

पहिला पती करण वीर मेहरा आणि निधी सेठ यांची पहिली भेट २००८ मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. एकत्र काम करताना प्रेमात पडले आणि नंतर दोघांनी लग्न केले. करण वीर मेहराचे हे दुसरे लग्न होते. त्याने २००९ मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण देविकाशी लग्न केले होते, पण काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता. नंतर त्याने निधीशी लग्न केलं होते. पण हेही नातं टिकलं नाही. आता निधीने संदीपशी दुसरं लग्न केलं.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software