छ. संभाजीनगर जिल्ह्यात लम्पी आजाराची साथ, पशुसंवर्धन विभाग झोपा काढण्यात गुंग, संतप्त शेतकऱ्याने आजारी गाय आणली जिल्हाधिकारी कार्यालयात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्ह्यात लम्पी आजाराची साथ पसरली असून, पशुसंवर्धन विभाग मात्र झोपा काढण्यात गुंग आहे. त्‍यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. बानेगावच्या शेतकऱ्याने वारंवार पशुसंवर्धन विभागाकडे विनंत्‍या केल्या, तरी दखल घेतली गेली नाही. त्‍यामुळे शेतकऱ्याने त्‍याची लम्पी ग्रस्त गाय चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून प्रशासनाचे लक्ष वेधले. गोमातेला राज्यमातेचा दर्जा सत्ताधाऱ्यांनी दिलाय खरा, नोकरशाहांनी त्‍यांच्या उद्देशालाच हरताळ फासला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फूटपाथवर मरणासन्न अवस्थेतील गाय ठेवून तिच्यावर मेनकापड धरून मला जगू द्या, असा फलक धरून शेतकरी नारायण घागरे भरपावसात उभे होते आणि गायीच्या उपचारासाठी दाद मागत होते. शेतकरी घागरे म्हणाले, की मी १५ दिवसांपासून पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करतोय. मात्र कुणी प्रतिसाद देत नाही. त्यामुळे मी गायीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणले आहे. पावसामुळे कुणीही उपचाराला येत नाही. ही बाब जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना कळताच त्यांनी तत्काळ जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला आदेश दिले. करमाड येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावून घेतले.

पशुवैद्यकीय डॉक्टरांची सारवासारव...
प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतल्याचे कळताच, एरवी शेतकऱ्याने वारंवार संपर्क करूनही कोणताही प्रतिसाद देण्याच्या मूडमध्ये नसलेल्या डॉ. गजानन चव्हाण यांचे धाबे दणाणले. त्यांनी तातडीने सारवासारव करत  किडनी, लिव्हर फेल होऊन गायीला न्यूमोनिया झाला असून, अशा अवस्थेत उपचारांना प्रतिसाद मिळत नाही, असा दावा केला. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software