शाळकरी विद्यार्थ्याचा शिवना नदीत बुडून मृत्यू, गंगापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील पेंडापूर शिवारातील शिवना नदीच्या पाण्यात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (३० नोव्‍हेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास समोर आली. भीमराज ताराचंद राठोड (वय १६, रा. पेंडापूर, ता. गंगापूर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

भीमराज दहावीत शिकत होता. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने जनावरे चारायला घेऊन आला. शिवना नदीच्या पाण्यात जनावरे धुण्यासाठी तो पाण्यात उतरला. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडू लागला. त्याला पोहता येत नव्हते. भीमराजच्या मामेभावाने तो बुडत असल्याचे पाहिल्याने आरडाओरड करत गावाकडे धाव घेतली. भीमराजच्या कुटुंबासह गावकऱ्यांनी नदीकडे धावून त्याला पाण्यातून बाहेर काढले. गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड

Latest News

छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड
छत्रपती संभाजनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : निवृत्त प्राध्यापकाची बंदुकीतून गोळी झाडून रीलस्टार मित्रानेच हत्या केली. नंतर ‘दृश्यम’ चित्रपटातील कथानकाप्रमाणे पोलिसांची...
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software