डोंगरावरील दगडावर बसले मित्र, अचानक दगड घसरून १५ वर्षीय मुलगा दगडाखाली!, चेंगरून मृत्यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : उमरावती (ता. फुलंब्री) येथे गुरुवारी (३० ऑक्टोबर) दुपारी डोंगरावरील दगड घसरून त्याखाली चेंगरून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अत्रिनंदन गणेश खमाट (वय १५, रा. उमरावती) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

अत्रिनंदन हा आळंद येथील न्यू हायस्कूलमध्ये नववीत शिकत होता. दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने दोन मित्रांसोबत घराजवळील डोंगरावर फिरायला गेला. तिघे डोंगरावरील एका मोठ्या दगडावर बसून गप्पा मारत असतनाच पावसामुळे सैल झालेला दगड अचानक घसरला. दोघे बाजूला पडले, तर अत्रिनंदन ऐन दगडाखाली आला. मुलांची आरडाओरड ऐकून ग्रामस्थ धावून आले. त्यांनी अत्रिनंदनला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र शुक्रवारी (३१ ऑक्‍टोबर) पहाटे त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software