गरवारे स्टेडियमवर ‘नो एंट्री’ म्हणताच तरुणांचा मोर्चा जी. श्रीकांत यांच्या बंगल्यावर... काय आहे प्रकरण...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आओ जाओ घर तुम्हारा, अशी म्हण सध्या गरवारे स्टेडियमला लागू होते. नियमांची अंमलबजावणी केल्यानंतर एका ॲकॅडमीच्या तरुणांनी थेट महापालिका आयुक्‍तांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. जी. श्रीकांत यांच्या जलश्री बंगल्यावर तरुण धडकले, मात्र आयुक्‍त न भेटल्याने तसेच माघारी फिरले. हा प्रकार शुक्रवारी (१२ डिसेंबर) सायंकाळी घडली.

शहरात अनेक खासगी अकॅडमी विद्यार्थ्यांकडून भरती प्रशिक्षणाचे शुल्क वसूल करतात. मात्र त्यांच्याकडे मोकळे मैदानच नाहीत. ते महापालिकेच्या मैदानावर सराव करून घेतात. गरवारे स्टेडियमवरही खासगी अकॅडमीच्या तरुणांना सरावासाठी आणले जाते. मात्र तरुणांकडून पैसे उकळणारी अकॅडमी महापालिकेला खडकूही देत नाही. अकॅडमी चालकांनी मैदानावर सराव करून घेण्यासाठी रीतसर फी भरावी, असे महापालिकेने सांगूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच गेल्या आठवड्यात भरतीसाठी सराव करणाऱ्या एका तरुणीने महापालिकेच्या माजी सैनिकावर विनयभंगाचा आरोप केला. त्यामुळे अकॅडमीच्या दीडशे ते दोनशे तरुण, तरुणींना मैदानात सराव करण्यास दोन दिवसांपासून बंदी घालण्यात आली. शुक्रवारी (१२ डिसेंबर) सायंकाळी काही तरुणांनी पावती न फाडता मैदानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थापनाच्या ही बाब लक्षात येताच त्यांना अडवले. त्यामुळे तरुण संतप्त झाले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software