- Marathi News
- सिटी डायरी
- मनपा बॅकफूटवर येताच ‘अतिक्रमण हटाव’ला विरोध करणाऱ्यांनी खाल्ली उचल!
मनपा बॅकफूटवर येताच ‘अतिक्रमण हटाव’ला विरोध करणाऱ्यांनी खाल्ली उचल!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : फौजफाटा घेऊन रस्ते मोकळे करायला निघालेल्या महापालिकेला पोलिसांनी तितक्यात उत्साहाने साथ दिल्याने जवळपास पावणेपाच हजार मालमत्ता अतिक्रमणे जमीनदोस्त झाली. आता आधी रितसर नोटीस, मार्किंग, शंका-निरसन आणि त्यानंतर पाडापाडी करा, असे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी बजावल्याने महापालिका बॅकफूटवर आली. त्यामुळे अतिक्रमण हटविण्यास विरोध करणाऱ्यांनी उचल खाल्ल्याचे दिसून येत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महापालिका आयुक्तांना निवेदन देत रस्ता रुंदीकरण मोहीम थांबवण्याची मागणी केली आहे, तर आंबेडकरवादी संघर्ष समितीने चक्क गुरुवारी (७ ऑगस्ट) शेकडो नागरिकांसह भडकल गेट ते महापालिकेपर्यंत मोर्चा काढला. मनपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हर्सूल येथील श्री हनुमान मंदिर ४०० वर्षे जुने असून पुरातन वास्तू आहे. मंदिराचा काही भाग राष्ट्रीय महामार्गासाठी आधीच दिलेला आहे. आता स्थलांतरासाठी जागा शिल्लक नाही. जळगाव रस्ता ३० मीटर असून सध्या हर्सूल गावात सर्व्हिस रस्त्याची गरज नाही. त्यामुळे हनुमान मंदिराच्या पाडापाडी व स्थलांतराला स्थगिती द्यावी, अशी मागणी हनुमान मंदिराच्या विश्वस्त मंडळाने केली आहे.
रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली कोणतीही कायदेशीर नोटीस न देता घरे पाडल्याचा आरोप करत आंबेडकरवादी संघर्ष समितीने मोर्चा काढला. महापालिका आयुक्त स्वतः येऊन आमचे म्हणणे ऐकेपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. मात्र आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला गेलेले असल्याने आंदोलक ताटकळले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सुनील पाटील पैठणचे नवे SDPO, अवैध धंदेवाल्यांवर फास आवळणार
By City News Desk
लग्नासाठी आलेल्या पाहुण्याचा नागडोहात बुडून मृत्यू, कन्नडची घटना
By City News Desk
रुग्णवाहिका थेट दुभाजकावर आदळून चालक गंभीर, बीड बायपासची दुर्घटना
By City News Desk
लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी
By City News Desk
Feature : जीवनातील रहस्ये कळतात जिभेवरून
By City News Desk
श्रीमंत-गरीब भेद करणाऱ्या पाडापाडीविरुद्ध छ. संभाजीनगरात मोठा मोर्चा!
By City News Desk
Latest News
10 Aug 2025 07:11:57
वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून घराची बाल्कनी महत्त्वाची आहे. बाल्कनी वास्तुशास्त्रानुसार बांधली गेली असेल आणि त्याची देखभाल देखील वास्तु सूचनांनुसार केली गेली असेल,...