महिलांनी मतदान जनजागृतीसाठी योगदान द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी महिलांनी योगदान द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे आज महिला मतदार जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या मेळाव्यास मार्गदर्शन केले. ऐश्वर्या आघाव, डॉ. रश्मिता श्रीनिवासन, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी महिलांनी योगदान द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे आज महिला मतदार जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या मेळाव्यास मार्गदर्शन केले. ऐश्वर्या आघाव, डॉ. रश्मिता श्रीनिवासन, डॉ. अर्चना राणे, अर्चना गायकवाड, आशाताई शेरखाने, संगिता देशपांडे, श्रीमती बोर्डे अशा विविध क्षेत्रातील मान्यवर महिला तसेच मनपा उपायुक्त अंकुश पांढरे, स्वप्निल सरदार, संजीव सोनार आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, आपल्याला मिळालेले अधिकार, हक्क लोकशाही मुळे मिळाले आहेत. हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लोकशाही बळकट करण्यासाठी आपले योगदान देणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. महिलांमध्ये महिलांनी मतदानविषयक जनजागृती करुन योगदान द्यावे,असे आवाहनही स्वामी यांनी केले.

उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांनीही महिलांशी संवाद साधून मतदानाचा अधिकार बजावण्याबाबत आवाहन केले. प्रास्ताविक स्वप्निल सरदार यांनी केले तर अंकुश पांढरे यांनी आभार मानले. संजीव सोनार यांनी सूत्रसंचलन केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update 

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update  छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर...
शिवसेनेचा शिंदे गट, शिंदे गटातही दोन गट, मंत्री शिरसाट- आ. जैस्वाल यांच्यात धुसफूस?
सुसाट कंटेनरने घेतला युवकाचा बळी, चिकलठाणा आठवडे बाजारसमोर अंगावर शहारे आणणारा अपघात, साताऱ्यातही जेसीबीची ९ वर्षीय चिमुकल्याला धडक
गंगापूर पोलीस ठाण्याचे आवार बनले राजकीय कुस्तीचा ‘आखाडा’!; निवडणुकीतील धुसफुसीतून दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांनी लाठीमार करून पांगवली गर्दी 
जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई : आ. विलास भुमरेंसोबत चिमुकल्याला मतदान कक्षात प्रवेश दिल्याने ३ कर्मचारी निलंबित!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software