महापालिकेतून : नळांना लागणार स्मार्ट मीटर; प्रत्‍येकाला साडेबारा हजारांचा भुर्दंड बसणार भोऽ!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नवीन पाणीपुरवठा योजनेत नळांना मीटर बसविण्याची अट असून, हे मीटर डिजिटल असणार आहे. यासाठी प्रत्‍येकी १० हजार रुपये खर्च येणार आहे. शिवाय नवीन जोडणीसाठी अडीच हजार रुपये नागरिकांना वेगळा खर्च येणार आहे. शहरात २ लाख ८० हजार मीटर बसविण्यात येणार आहेत. गोरगरीब जनतेला मोफत मिटर बसवून देण्यात येणार असून, इतरांकडून […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नवीन पाणीपुरवठा योजनेत नळांना मीटर बसविण्याची अट असून, हे मीटर डिजिटल असणार आहे. यासाठी प्रत्‍येकी १० हजार रुपये खर्च येणार आहे. शिवाय नवीन जोडणीसाठी अडीच हजार रुपये नागरिकांना वेगळा खर्च येणार आहे. शहरात २ लाख ८० हजार मीटर बसविण्यात येणार आहेत. गोरगरीब जनतेला मोफत मिटर बसवून देण्यात येणार असून, इतरांकडून मात्र पैसे घेण्यात येतील, अशी माहिती महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली. त्‍यामुळे सामान्यांना लवकरच साडेबारा हजार रुपयांचा भुर्दंड बसणार हे नक्की झाले आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीकडून करवून घेतले जात आहे. आतापर्यंत योजनेचे काम ७४ टक्‍के पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा कल आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेत ६०० एमएलडी पाणी शहरात आणण्याची क्षमता राहील. मात्र शहरातील प्रत्येक नळाला स्मार्ट मीटर बसविले जातील.

२० बाय ३० मध्ये राहणारे गरीब, जी मंडळी इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाहीत, त्यांच्याकडून पैसे घेतले जाणार नाहीत. इतर मंडळींना मिटरचे किमान १० हजार रुपये तरी द्यावे लागतील. रस्ता तोडण्यासाठी २५ हजार रुपयांपर्यंत शुल्‍क लागेल, असे जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले. सोसायट्या, मोठ्या इमारतींना एकच मीटर ठेवण्यासंदर्भात विचार सुरू असून, मीटर कसे असावेत यासंदर्भात चाचपणी केली जात आहे. लवकरच निविदाही काढली जाईल. मीटर बसविण्याचे काम महापालिका करणार असल्याचे जी. श्रीकांत म्हणाले.

चंपा चौक ते जालना रोडचे काम मार्गी लागणार…
चंपा चौक ते जालना रोडपर्यंत १०० फुटी रस्‍त्‍यासाठी महापालिका सरसावली आहे. जी. श्रीकांत यांनी रस्त्यासाठी संयुक्त मोजणीचे आदेश दिले आहेत. रस्त्यात ५०० ते ६०० मालमत्ताधारक राहत आहेत. त्यांना पीएम आवास योजनेत घरे देण्याचा विचार केला जात आहे. २०११ मध्येही रस्त्यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र मोठ्या प्रमाणात मालमत्ताधारक बेघर होणार असल्याने महापालिकेने माघार घेतली होती. मात्र आता त्‍यांना पीएम आवास योजनेत घरे देऊन हे काम मार्गी लावण्याचा विचार जी. श्रीकांत यांनी केल्याचे दिसून येत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

Latest News

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!! शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...
आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक, नोकरी मागण्यासाठी आला होता...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software