वडगाव कोल्हाटीतील थरार : अनैतिक संबंधातून ३० वर्षीय युवकावर प्राणघातक हल्ला, ६ जणांची घरात घुसून लोखंडी रॉडने अमानुष मारहाण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : ६ जणांच्या टोळक्याने घरात घुसून ३० वर्षीय युवकावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला चढवला. यात युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटी येथे सोमवारी (१७ नोव्‍हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

जखमी युवक मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील असून, तो वाळूज एमआयडीसीत खासगी नोकरी करतो. हल्लेखोर योगेश नामदेव जाधव (वय ३१, रा. म्हारोळा, ता. पैठण) आणि दिनेश सोबकचंद मेहर (वय ३४, रा. पेंढापूर, ता. गंगापूर) यांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पकडले असून, त्यांच्याकडील स्विफ्ट कार जप्त केली आहे. त्यांचे साथीदार फरारी असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

जखमी युवकाच्या घराजवळ काही महिन्यांपूर्वी योगेश जाधव भाड्याने राहत होता. त्यावेळी जखमी युवकाच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय निर्माण झाला होता. १० नोव्हेंबरला सायंकाळीसुद्धा युवकाला कारने धडक देऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. दुचाकीने घरी परतत असताना चोरडिया फार्महाऊसजवळ मागून आलेल्या कारने त्याला सलग दोनदा धडक दिली होती. त्यावेळीही युवकाने हेल्पलाइन नंबर ११२ वर कॉल करून माहिती दिली होती.

सोमवारी रात्री काय घडलं?
सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास योगेश साथीदारांसह युवकाच्या घरासमोर आला. त्याने युवकाच्या पत्नीला आवाज देत दरवाजा उघडायला सांगितले. त्यावर युवकाच्या पत्नीने त्याला निघून जायला सांगितले. मात्र तरीही योगेश जोरजोरात दरवाजा वाजवून निघून गेला. त्यानंतर ५ साथीदारांना घेऊन तो पुन्हा युवकाच्या घराकडे आला. सहा जण दरवाजा तोडून युवकाच्या घरात शिरले. युवकाला लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याला जबरदस्ती कारमध्ये कोंबून कांचनवाडीकडे नेत होते.

मात्र कार काही अंतरावर बंद पडली. त्यामुळे तरुणाने संधी साधून पळ काढत पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. तिथून त्याला बजाजनगरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्या डोके, पाठ, हातावर खोल जखमा झाल्या असून, ७० टाके पडले आहेत. अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत हल्लेखोरांचा शोध सुरू केला. योगेशला त्याचा मित्र दिनेशसह ताब्यात घेतले. अन्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software