लग्नाला २ तास बाकी होते, नवरीचा मेकअप सुरू होता, तितक्यात मंडपात पोलिसांची एंट्री!; म्हणाले, थांबा... हे लग्न नाही होऊ शकणार!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : रस्त्यालगत लग्नमंडप उभारला, वऱ्हाडी मंडळीही आली. जेवणाची तयारी सुरू होती. मंडपात हळदीचा कार्यक्रम झालेला होता. नवरीचा मेकअप सुरू होता. दोन तासांत वधू-वरावर अक्षता पडणारच होत्या... पण तितक्यात पोलीस येऊन धडकले. वधू अल्पवयीन असल्याच्या संशयावरून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. वधू अवघ्या १६ वर्षांची निघाली. पोलिसांनी लग्न थांबवून वधू-वराच्या नातेवाइकांना समजावून सांगितले. कायद्याची माहिती दिली. त्यामुळे लग्न रद्द करण्यात आले. वधूचे वय होईपर्यंत लग्न न लावण्याचे लेखी घेण्यात आले... पोलीस येऊन धडकताच वराला मात्र नातेवाइकांनी आधीच गायब केले होते. छत्रपती संभाजीनगर शहरातील हमालवाडा येथे रविवारी (२ नोव्‍हेंबर) सकाळी १० वाजता हा प्रकार घडला.

१६ वर्षीय मुलीचा २५ वर्षीय मुलासोबत विवाह होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास समिती आणि दामिनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हमालवाड्यात थाटामाटात लग्नाची तयारी केलेली होती. दामिनी पथकाने माहिती घेतली असता लग्न दुपारी १२.३० वाजता लागणार असल्याचे कळले. त्यांनी लग्नमंडपात अचानक एंट्री केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

पथकाने नातेवाइकांची चौकशी केली. मुलीचे वय १६ वर्षे असल्याचे समोर आले, तर नवरदेव २५ वर्षांचा होता. नगर जिल्ह्यातील शिर्डी येथू वऱ्हाड आले होते. दोन्हीकडील नातेवाइकांना कायद्याची माहिती देत विवाह रोखायला सांगितला.  नवरी जालना जिल्ह्यातील शहागडची, तर नवरदेव शिर्डीचा होता. मुलगी १२ वीत शिकते. तिच्या आईचे माहेर हमालवाडा येथे आहे. मुलीचे वडील दारूच्या आहारी गेलेले असल्याने आईच्या माहेरच्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. लग्नाचा खर्च काका, मावशी, मामा यांनी उचलला होता. नवरदेव चहाटपरी चालवतो. मुलीने दामिनी पथकाला सांगितले, की मला शिकायचे होते. पण घरच्या परिस्थतीमुळे लग्नास तयार झाली. यावेळी नवरीला अश्रू आवरता आले नाहीत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software