घराची कडी कुणी वाजवली... मिसारवाडीत चौघांना बेदम मारहाण!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घराची कडी का वाजवली, असे म्हणून पाच जणांनी शेकोटी करून बसलेल्या चौघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना मिसारवाडी येथे रविवारी (१८ जानेवारी) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास घडली. सिडको पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गोविंद भिमा मकळे (वय ३९, रा. मिसारवाडी मोकळ्या मैदानाजवळ) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. सध्या ते घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला. त्यांनी सांगितले, की रविवारी (१८ जानेवारी) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास ते व बरकत शहा नसीब शहा व आणखी दोन जण थंडीचे शेकोटी करून आशीर्वाद बिल्डींगजवळ बसलेले होते. तेव्हा तेथे बाजूला राहणारे मोहम्मद भाई व त्यांच्यासोबत चार जण (नाव पत्ता माहीत नाही) आले. तुम्ही आमच्या घराची कडी का वाजवली, असे म्हणून त्यांनी मकळे यांच्यासह बरकत शहा व सोबतच्या आणखी दोघांना शिवीगाळ करून हाताचापटाने व लाथेने पोटावर, छातीवर मारून जखमी केले. अधिक तपास पोलीस अंमलदार एकनाथ चव्हाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software