गावठी कट्टा बाळगणाऱ्या टवाळखोराच्या आवळल्‍या मुसक्या!; मुकुंदवाडी पोलिसांची कामगिरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गावठी कट्टा बाळगून लोकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या २३ वर्षीय टवाळखोराला मुकुंदवाडी पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (१३ जानेवारी) रात्री मुकुंदनगरातील पगारे यांच्या पानटपरीजवळ, रेल्वे गेट क्र. ५६ जवळ करण्यात आली.

संदेश शांतीलाल राठोड (वय २३, रा. मुकुंदनगर मुकुंदवाडी) असे पकडण्यात आलेल्या टवाळखोराचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी गावठी कट्ट्यासह २ जीवंत काडतुसे असा एकूण ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सूत्रांच्या माहितीनुसार, मुकुंदनगरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सुजल शर्मा, विकास गुरुखेल आणि रवि बेंडे यांना गोपनीय माहिती मिळाली, की संदेश राठोड गावठी कट्टा बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत. सुजल शर्मा यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांना दिली.

त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री. वायाळ यांच्या नेतृत्त्वात सुजल शर्मा, विकास गुरुखेल आणि रवि बेंडे यांनी रेल्वे गेट क्र. ५६ कडे धाव घेत संदेशच्या मुसक्या आवळल्या. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. बहुरे करत आहेत. यापूर्वीही सुजल शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आतापर्यंत अवैध शस्‍त्रास्‍त्र बाळगणाऱ्या अनेकांना कायद्याचा धडा शिकवला आहे. या कारवाईबद्दल वरिष्ठांकडून या पोलिसांचे कौतुक होत आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software