हिट ॲन्ड रन : सुसाट कारने वृद्धाला उडवले, उपचारादरम्यान मृत्यू, मिटमिट्याची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्ता ओलांडत असलेल्या वृद्धाला सुसाट कारने उडवले आणि कार वेगात निघून गेली. गंभीर जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्‍यू झाला. ही घटना मिटमिटा येथे घडली. रविवारी (१८ जानेवारी) छावणी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मंजुषा अंकुश गावत्रे (वय ३५, रा. गोणसा ता. वणी जि. यवतमाळ) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. बोलेरो गाडीने मंजुषा यांचे वडील कवडू गोविंदा चौधरी (वय ६२, रा. लोणी पो. माथा ता. कोरपणा जि. चंद्रपूर) हे गावातील काही लोकांसोबत देव दर्शनासाठी शिर्डी देवस्थानला जात होते. ३ जानेवारीला रात्री साडेदहाच्या सुमारास नाशिक महामार्गावर ग्रिनचिल्ली हॉटेलसमोर मिटमिटा येथे जेवण करण्यासाठी त्यांची गाडी थांबली. रस्ता ओलांडत असताना कवडू चौधरी यांना सुसाट कारने धडक दिली आणि वेगात निघून गेला. गंभीर जखमी कवडू यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा ८ जानेवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत्‍यू झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गीता हाके करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software