छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे फेसबुकवर फेक खाते, सायबर पोलिसांत तक्रार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर  (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट उघडून सायबर भामट्यांनी अनेकांना पैशांची मागणी केली. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (४ नोव्हेंबर) पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाची बदनामी करण्याचा प्रयत्न या फेसबुक अकाऊंटवरून झाल्याचे समोर येते. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी पत्रकारांना सांगितले, की सायबर भामट्याविरुद्ध तक्रार अर्ज आला आहे. मेटा कंपनीला कळवले आहे. यापूर्वीही अनेकदा महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने खोटे खाते उघडून लोकांना पैसे मागण्याचे प्रकार घडले आहेत.

असे ओळखा फेक खाते
अनेकदा अधिकाऱ्यांच्या किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने बनवलेली फेक खाती लोकांकडून माहिती किंवा पैसे उकळण्यासाठी वापरली जातात. असे खाते ओळखण्यासाठी मेट्रोपोलिस पोस्टच्या वतीने आम्ही नागरिकांना गोष्टी सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही असे फेक खाते ओळखू शकाल. बहुतांश अधिकारी Verified Badge (निळा टिकमार्क) असलेले खाते वापरतात. जर निळा टिकमार्क नसेल, तर सावध राहा. अधिकृत खात्यावर नेहमी सरकारी कार्यक्रम, मीटिंग्ज, आदेश, दौरे, जनसंपर्क यासंबंधी पोस्ट्स असतात. जर खाते फक्त सेल्फी, शुभेच्छा, वैयक्तिक फोटो किंवा जाहिरातीसदृश पोस्ट्स करत असेल, तर ते बनावट असण्याची शक्यता जास्त. कोणताही अधिकारी कधीही फेसबुकवरून पैसे, मदत किंवा वैयक्तिक माहिती मागत नाही. जर मी अधिकारी अमुक आहे, मदत करा किंवा या नंबरवर पैसे पाठवा असे मेसेज आले तर ते १००% फेक खाते आहे.  फेसबुक लिंक (URL) आणि नाव तपासा. अधिकृत खाते नेहमी पूर्ण नावाने असते, उदा. facebook.com/IAS.AnilDeshmukh. फेक खाते मात्र facebook.com/anil.deshmukh123 किंवा facebook.com/real.anil.deshmukh1 अशा स्वरूपात असते. अशा extra words किंवा numbers असलेली प्रोफाइल्स संशयास्पद असतात.

अधिकाऱ्यांचे खरे खाते बहुतेक वेळा स्थानिक पत्रकार, सरकारी विभाग, नागरिक संस्था यांच्याशी जोडलेले असते. फेक खात्यांमध्ये मात्र अनाहूतपणे सामान्य लोक किंवा इतर राज्यांतील लोक मोठ्या संख्येने असतात. खऱ्या खात्यातील फोटो बहुतेक वेळा माध्यमांमध्ये वापरलेले अधिकृत फोटो असतात. फेक खात्यांमध्ये फोटो इंटरनेटवरून कॉपी केलेले किंवा खासगी स्वरुपाचे (उदा. फुलं, धार्मिक चिन्हं) असतात. त्या अधिकाऱ्यांचे अधिकृत कार्यालय किंवा सरकारी वेबसाइट तपासा. तेथे बहुतेकदा Official Social Media Handles अशी यादी दिलेली असते. त्या यादीत जर तो फेसबुक प्रोफाइल नसेल तर ते खाते फेक आहे. जर खात्री पटली की खाते फेक आहे, तर प्रोफाइलवर जा. वरच्या तीन डॉट्सवर क्लिक करा. Find support or report profile → Pretending to be someone → A celebrity or public figure निवडा आणि Facebook ला रिपोर्ट करा.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software