माथेफिरूने हद्दच केली... चक्क आजीबाईचे घर जाळले!, कारण ऐकून तर कुणीही होईल थक्क..., बेगमपुऱ्याच्या तारकस गल्लीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुऱ्यातील तारकस गल्लीत बुधवारी (१९ नोव्‍हेंबर) रात्री अकराच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. एका माथेफिरू युवकाने चक्क एका वृद्धेचे घर जाळले. त्याला राग ज्या गोष्टीचा आला, ते वाचून तुम्हीही थक्क व्हा. आजीला लेकीकडे जेवायला जायचे, त्याचवेळी युवक त्‍यांच्याकडे आला. वृद्धेला लेकीकडे जायचे असल्याने त्याला जायचे सांगितले. त्याला इतका राग आला, की त्याने वृद्धा लेकीकडे जाताच घर जाळले...

शांताबाई आसाराम शिंदे (वय ७० रा. तारकस गल्ली बेगमपुरा) यांनी य प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या मागील ५ वर्षांपासून अॅड. संजय डोंगरे यांच्या घरात नातवासोबत किरायाने राहतात. ॲड. डोंगरे यांची दोन मजली इमारत असून वरील मजल्यावर त्या राहतात. ग्राउन्ड फ्लोअरवर शिवप्रसाद ओमकार लाल शर्मा हे त्याचा मुलगा मयूर शिवप्रसाद शर्मा (वय ३२) याच्यासोबत भाड्याने राहतात. शांताबाई मजुरी करून उदरनिर्वाह करतात. बुधवारी (१९ नोव्‍हेंबर) रात्री पावणेअकराच्या सुमारास शांताबाई घरातील कामात असताना मयूर त्यांच्याकडे आला. आई जेवण झाले का, असे म्हणून शांताबाई यांच्याशी गप्पा करू लागला. शांताबाई यांना मुलीकडे जायचे असल्याने त्यांनी त्याला मला मुलीकडे जायचे आहे, असे म्हणून जायला सांगितले. त्यावर त्याला राग आला.

तो म्हणाला, की निघ म्हातारे इथून तू गेली की मी तुझे घरच जाळतो, अशी धमकी त्याने दिली. शांताबाई यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. शांताबाई या घराला कडी लावून मुलीकडे ढिंबरगल्ली, बेगमपुरा येथे गेल्या. त्यानंतर रात्री ११ ला शांताबाई यांच्या मुलीला गल्लीतील कोणीतरी कॉल करून सांगितले, की तुझ्या आईच्या घरात आग लागली आहे. त्यामुळे शांताबाई आणि त्यांची मुलगी वंदना या लगेचच घराकडे आल्या. घराला पूर्ण आग लागलेली दिसली. शांताबाई यांनी लोकांच्या मदतीने पोलीस व अग्‍निशमन विभागाला कळवले. अग्‍निशमन विभागाने येऊन आग विझवली. मयूर शर्मा यानेच माझ्या घराला आग लावली आणि आगीत २५ हजार रुपयांचे नुकसान झाले, अशी तक्रार शांताबाई यांनी केली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार राजकुमार जाधव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software