ओॲसिस चौकात सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला मागून कंटेनरने उडवले, महिलेचा जागीच मृत्यू, ‘नेहा’च्या अफाट संयमाने गर्दीच्या काळजात धस्स..., छत्रपती संभाजीनगरची हृदयद्रावक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव कंटेनरने सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली. यात ४५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर महिलेसोबत तरुण मुलगी आणि पती होते. हा भीषण अपघात छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील वाळूज एमआयडीसीतील ओॲसिस चौकात सोमवारी (१२ जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. मुलीच्या डोळ्यांदेखल आईचा मृत्यू झाला, त्यावेळी वडील अक्षरशः भांबावून गेल्याचे पाहून मुलीने अश्रू आवरत त्यांना बाबा मी आहे ना... असे म्हणत आधार दिला. ते पाहून जमलेल्या गर्दीच्या काळजात अक्षरशः धस्स झाले...

आशा दिलीप ढाकरके (वय ४५, रा. सावतानगर, रांजणगाव शेणपुंजी, वाळूज एमआयडीसी परिसर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांची मुलगी नेहाने (वय १८) दिलेल्या तक्रारीनुसार वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. कंटेनर अपघातस्थळी सोडून तो पळून गेला होता.
असा घडला अपघात...
आशा ढाकरके यांची प्रकृती बिघडल्याने ‘सीएसएमएस’ रुग्णालयात दाखल केले होते. उपचार घेतल्यानंतर त्यांना पती दिलीप ढाकरके व मुलगी नेहा हे दुचाकीवरून (क्र. एमएच २० सीडी ७४६०) घरी रांजणगाव शेणपुंजीकडे घेऊन जात होते. ओअॅसिस चौकात सिग्नल लागल्याने दुचाकी थांबवली. त्याचवेळी मागून भरधाव आलेल्या कंटेनरने (क्र. एमएच ४६ बीयू २३९८) त्यांना जोरात धडक दिली. यात तिघेही रस्त्यावर फेकले गेले. आशा कंटेनरच्या मागील चाकाखाली आल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. वाहतूक पोलिसांनी धाव घेऊन आशा यांना रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात नेले असता दुपारी १:३० वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

नेहाचा अफाट संयम...
मदत करण्याऐवजी काही जण अपघाताचे फोटो काढण्यात व्यस्त होते. त्यांच्याकडे मदतीसाठी नेहा विनवणी करत होती. या वेळी पत्नीचा डोळ्यांदेखत मृत्‍यू झाल्याने वडिलांना मानसिक धक्का बसल्याचे पाहून नेहाने स्वतःला सावरले आणि वडिलांना बाबा मी आहे ना, म्हणत धीर देऊ लागली. ते पाहून गर्दी तिच्या अफाट संयमाने अक्षरशः शॉक्ड झाली. आईचा हात हातात घेऊन वडिलांना धीर देत होती. आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतरही कागदपत्रे काढणे, सह्या करणे, आवश्यक माहिती देणे हे सर्व ती करत होती. या वेळी घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनीही तिच्यातील पोक्तपणाचे कौतुक केले. इतक्या मोठ्या दुःखातही एवढा संयम आणि परिपक्वता दाखवणे सहज शक्य नाही, असे उद्‌गार डॉक्टरांनी काढले. आशा या खासगी कंपनीत कामगार होत्या. त्यांच्या पश्चात पती, चार मुली असा परिवार आहे. महामार्गावरील अवजड वाहनांच्या बेदरकारपणावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software