अभ्यासाच्या तणावातून घर सोडलेला १४ वर्षीय मुलगा सुखरुप आईच्या कुशीत!, केदारनाथला जायचे होते, पाचोड, परळी, हैदराबाद, चेन्‍नईहून गाठले कल्याण...

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडको एन ४ च्या तापडिया पार्कमध्ये राहणाऱ्या व्यापाऱ्याचा १४ वर्षीय मुलगा ३० जुलैला सकाळी शाळेसाठी बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाला होता. तो गुरुवारी (७ ऑगस्ट) सात दिवसांनंतर स्वगृही सुखरूप परतला आहे. त्‍यामुळे त्‍याच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. मुलाने केदारनाथ गाठायचे ठरवले होते.

मुलगा शाळेसाठी घराबाहेर पडला होता. मात्र, दुपारी ३ पर्यंतही तो घरी न आल्याने आईने शाळेत संपर्क केला. त्यावर शिक्षकांनी तो शाळेतच आला नाही, असे सांगितले. त्‍यामुळे आई घाबरून गेली. बसचालकाला विचारणा केली असता त्याने तो बसमध्येही आला नसल्याचे सांगितल्याने कुटुंब हादरले. त्यांनी तातडीने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील म्हस्के यांना मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिले.

मुलगा घरातून थेट सिडको बसस्थानकावर गेला, तिथे एकाला बीडला जायचे असल्याचे सांगून पाचोडपर्यंत गेला. पुढे तो कुठे गेला, हे समोर येत नव्हते. पुढे तो बीड, मांजरसुब्याला थांबून परळीला पोहोचला. परळीला तो एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळला. पोलीस पोहोचेपर्यंत त्याने परळी सोडले होते. परळीवरून त्याने रेल्वेमार्गे थेट हैदराबाद गाठले. तिथून रेल्वेनेच चेन्नईला पोहोचला. चेन्नईमध्ये काही दिवस थांबून कल्याणला आला.

कल्याण रेल्वेस्थानकावर त्याला रडताना पाहून रेल्वे पोलिसांनी चौकशी केली. त्याच्या दप्तरातून संपर्क क्रमांक मिळवून त्याच्या वडिलांना कॉल केला. त्यानंतर लगेचच शहर पोलिसांनी तत्काळ कल्याण गाठून मुलाला सुरक्षित ताब्‍यात घेतले. अभ्यासाच्या तणावातून घर सोडल्याची कबुली मुलाने दिली आहे. त्‍याला केदारनाथला जायचे होते. त्‍यासाठी ३ राज्‍यांत २ हजार ९११ किलोमीटर प्रवास त्याने केला. मुलगा सुरक्षित परतल्याने आई-वडिलांच्या जिवात जीव आला आहे. गेले ७ दिवस त्‍यांनी अक्षरशः अन्नापाणी त्‍यागल्याचे चित्र होते. कुणाचाही कॉल आला तरी त्‍यांच्या अपेक्षा जागृत व्हायच्या. अखेर मुलगा सुरक्षित मिळाल्याने कुटुंबाचे अश्रू थांबले आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वास्तुशास्‍त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत

Latest News

वास्तुशास्‍त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत वास्तुशास्‍त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत
वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून घराची बाल्कनी महत्त्वाची आहे. बाल्कनी वास्तुशास्त्रानुसार बांधली गेली असेल आणि त्याची देखभाल देखील वास्तु सूचनांनुसार केली गेली असेल,...
Tech News : चुकूनही गुगलवर सर्च करू नका या ४ गोष्टी अडचणीत सापडाल, तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते...
सुनील पाटील पैठणचे नवे SDPO, अवैध धंदेवाल्यांवर फास आवळणार
रक्षाबंधनासाठी घरी येताना भरधाव पिकअपची धडक, दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्‍यू, वैजापूर तालुक्‍यातील दुर्घटना
लग्‍नासाठी आलेल्या पाहुण्याचा नागडोहात बुडून मृत्‍यू, कन्‍नडची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software