बजाजनगरातील थरारपटाचा चौथा कलाकार असा आला टप्प्यात, सोबत ४ शस्‍त्रधारी मित्रही ताब्‍यात!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात बुधवारी (२४ सप्टेंबर) रात्री सव्वा आठला काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या तिघांनी एका युवकावर आधी चाकूने हल्ला केला, नंतर गावठी पिस्‍तुलातून गोळीबाराचा प्रयत्‍न केला होता. मॅगझिन खाली पडल्याने युवक वाचला होता. या घटनेतील तीन हल्लेखोरांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली, तर चौथा साथीदार पसार होता. त्‍याच्या मागावर शहर गुन्हे शाखाही होती. त्यांनी साजापूर चौफुली परिसरात सापळा रचून या चौथ्या हल्लेखोरावर झडप घातलीच, पण त्‍याचे ४ साथीदार ताब्‍यात घेतले. या सर्वांकडून धारदार शस्‍त्रे जप्त करण्यात आली आहे. कारसह एकूण १३ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई आज, २६ सप्टेंबरला पहाटे साडेतीनच्या सुमारास करण्यात आली.

मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आज पहाटे साडेतीनच्या सुमारास साजापूर चौफुली परिसरात पोलिसांनी सापळा रचला. काळी थार गाडी (एमएच २० एचएच ५२१४) टप्प्यात येताच पोलिसांनी हल्लबोल केला. कारमध्ये पाच शस्त्रधारी तरुण दबा धरून बसले होते. शरद भगवान कदम (वय २९, रा. शेखापूर), नितेश श्रीराम राठोड (वय २९, रा. फुलेनगर, पंढरपूर), वैभव बाळासाहेब शिंदे (वय १८, रा. शेखापूर), महादेव लक्ष्मण पवार (२३, रा. गुलाबवाडी), सुमित कैलास खोटकर (वय १८ रा. पंढरपूर) पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

अशी घडली होती घटना...
भोलानाथ श्यामराव कडमींचे (वय ३२, रा. वडगाव कोल्हाटी, मूळ रा. सिल्लोड) हा महाराणा प्रताप चौकातील मीनाताई ठाकरे मार्केट परिसरात उभा असताना काळ्या स्कॉर्पिओमधून तीन हल्लेखोर हातात धारदार शस्त्रे घेऊन आले व भोलानाथवर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. एकाने पिस्तूल काढून मॅगझीन लोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी पिस्तुलातील मॅगझीन आणि एक गोळी खाली पडल्याने फायरिंग होऊ शकले नाही आणि भोलानाथचे प्राण वाचले. ही घटना आर्थिक वादातून घडल्याचे तपासात समोर आले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software