शंभूनगर, दर्गा परिसरात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!; जवाहरनगर पोलिसांची कामगिरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : धारदार तलवार घेऊन सिग्मा हॉस्पिटल परिसरासह दर्गा चौक व शंभूनगरात दहशत माजविणाऱ्या २० वर्षीय तरुणाला जवाहरनगर पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडले. ही कारवाई शुक्रवारी (१५ नोव्‍हेंबर) सिग्मा हॉस्पिटलजवळ करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे व डायल-११२ चे पोलीस अंमलदार मारोती गोरे यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, एक व्यक्‍ती हातात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : धारदार तलवार घेऊन सिग्मा हॉस्पिटल परिसरासह दर्गा चौक व शंभूनगरात दहशत माजविणाऱ्या २० वर्षीय तरुणाला जवाहरनगर पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडले. ही कारवाई शुक्रवारी (१५ नोव्‍हेंबर) सिग्मा हॉस्पिटलजवळ करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे व डायल-११२ चे पोलीस अंमलदार मारोती गोरे यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, एक व्यक्‍ती हातात धारदार तलवार घेऊन सिग्मा हॉस्पिटल, दर्गा चौक व शंभूनगर परिसरात दहशत माजवत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्‍यांनी याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांना दिली. त्‍यांनी तत्‍काळ कारवाईच्या सूचना केल्या. त्‍यामुळे पोलीस पथकाने संशयिताचा सिग्मा हॉस्पिटल, दर्गा चौक परिसरात शोध घेतला असता तो सिग्मा हॉस्पिटलजवळील कुंपनाच्या मोकळ्या जागेत झाडाजवळ दिसून आला. पोलिसांना पाहून तो पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्‍याला पकडले. त्याची ओळख विचारली असता त्याने त्याचे नाव शेख आदिल शेख जावेद (वय २०, रा. शंभुनगर चाणक्यपुरी ग. नं. १, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले.

कसून चौकशीत त्‍याने सिग्मा हॉस्पिटलजवळील कुंपनात झाडा-झुडपात तलवार ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी ही ७० सेंटीमीटर लांबीची तलवार जप्त केली. त्‍याच्या ताब्‍यातून मोबाइलही जप्त करण्यात आला. वेळीच त्‍याच्या मुसक्या आवळण्यात आल्याने त्‍याच्यापासून होणाऱ्या संभाव्य गंभीर गुन्ह्याला रोखण्यात यश आले. त्‍याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार श्री. जमधाडे करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त नवनीत काँवत, सहायक पोलीस आयुक्त रंजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उमाजी शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारोती हरी खिल्लारे, सहायक फौजदार श्री. शिगाने, पोलीस अंमलदार श्री. पवार, श्री. क्षीरसागर, श्री. बनकर, श्री. काळे, मारोती गोरे, मोफतलाल राठोड, विजय सुरे यांनी पार पाडली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software