भयंकर… छ. संभाजीनगरमध्ये पोलिसांत तक्रार का केली म्‍हणत १७ वर्षीय मुलाची भररस्‍त्‍यात चाकू, कोयत्‍याने हत्‍या!; ५ जणांनी घेरले, सिनेस्टाइल रस्त्याने पळवत पळवत मारले…काही मिनिटांत रक्‍ताच्या थारोळ्यात गतप्राण झाला मुलगा…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आमच्या विरोधात पोलीस तक्रार का केली, असा जाब विचारत टोळक्‍याने १७ वर्षीय मुलाची लाकडी दांडे, चाकू व कोयत्यांनी भररस्‍त्‍यात हत्या केली. ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील विद्यापीठ गेट परिसरातील आम्रपालीनगरात सोमवारी (१४ ऑक्‍टोबर) रात्री अकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी ५ टवाळेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुमित काशीनाथ जावळे (वय १७, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आमच्या विरोधात पोलीस तक्रार का केली, असा जाब विचारत टोळक्‍याने १७ वर्षीय मुलाची लाकडी दांडे, चाकू व कोयत्यांनी भररस्‍त्‍यात हत्या केली. ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील विद्यापीठ गेट परिसरातील आम्रपालीनगरात सोमवारी (१४ ऑक्‍टोबर) रात्री अकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी ५ टवाळेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुमित काशीनाथ जावळे (वय १७, रा. आम्रपालीनगर, खांब नदीच्या काठावर, वि‌द्यापीठ गेटसमोर) असे मृत्‍यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ऋतिक ऊर्फ छोटू चव्हाण (रा. साईमंदिरामागे पहाडसिंगपुरा), आदी जयवीर टाक, जिता टाक (दोघे रा. सैनिक कॉलनी पहाडसिंगपुरा), ऋषि चव्हाण व जानू चव्हाण (दोघे रा. साई मंदिरामागे पहाडसिंगपुरा) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. पैकी ऋतिकला पोलिसांनी नाशिकवरून अटक केली आहे. सुमितचे वडील काशिनाथ सुदाम जावळे (वय ४५, रा. आम्रपालीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते मोहसीन भाई यांच्या घरात किरायाने राहतात. महानगरपालिकेत सफाई कामगार आहेत. त्यांना सुमित आणि रितेश काशीनाथ जावळे (वय १५) अशी दोन मुले आहेत. एक-दीड महिन्यापूर्वी त्यांचा मुलगा सुमित हा घाटी रुग्णालय परिसरात क्रिकेट खेळत असताना ऋतिक ऊर्फ छोटू चव्हाण, आदी जयवीर टाक, जिता टाक यांच्यासोबत त्याचे भांडण झाले होते. त्यांनी सुमितला मारहाण करून जखमी केले होते. त्याबाबत जावळे कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली होती.

रविवारी (१३ ऑक्‍टोबर) सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास ऋतिक ऊर्फ छोटू चव्हाण याची आई पूनम विजय चव्हाण व तिच्यासोबत काही मुले गाडीवर येऊन सुमित, प्रतिक संतोष वाडेकर व विशाल चावरिया यांचा शोध घेऊन शिवीगाळ करून धमक्या देत होते. पूनम चव्हाण ही या सर्वांना मारा, मी तुम्हाला सोडवून आणते असे म्हणून मारण्यासाठी चिथावणी देत होती. सोमवारी (१४ ऑक्‍टोबर) रात्री ११ च्या सुमारास काशिनाथ जावळे यांनी लहान मुलगा रितेश याला सांगितले, की सुमित अजून घरी आला नाही. त्याला बघून ये. त्‍यामुळे रितेश त्याला शोधण्यासाठी गेला. त्यानंतर थोड्याच वेळात काशिनाथ जावळे यांना आरडाओरड ऐकू आली. राजेश काकडे नावाच्या मुलाने पळत येऊन सांगितले, की सुमित यास काही मुलांनी चाकू मारला आहे. त्‍यामुळे काशिनाथ हादरून गेले. ते पळतच सुमितकडे गेले.

ब्लुमिंग बर्डस् शाळेच्या गल्लीमध्ये सुमित गंभीर जखमी होऊन रक्‍ताच्‍या थारोळ्यात पडलेला होता. रितेशने जोरजोरात रडत होता. रितेशने सांगितले की, मी सुमितला शोधण्यासाठी गेलो असता तो राजेश काकडे याच्यासोबत खांब नदीच्या काठावर बसून मोबाइल पाहत होता. मी सुध्दा तेथे थांबलो त्याचवेळी तिथे ऋतिक ऊर्फ छोटू चव्हाण, आदी जयवीर टाक, जिता टाक, ऋषि चव्हाण व जानू चव्हान हे आले. त्यांनी सुमितला घेरले. याला आपल्यासोबत घ्या, असे म्हणून त्याला ओढत घेऊन जात असताना आम्ही विरोध केला. मात्र त्यांनी ऐकले नाही. तेरा बहोत हो गया, तुने हमारे खिलाफ पोलीस स्टेशन में कम्प्लेंन्ट क्यू दिया? असे म्हणून त्याला बळजबरीने ओढत ब्लुमिंग बर्ड्‌स शाळेच्या गल्लीत घेऊन गेले त्यावेळी त्यांच्या हातात लाकडी दांडे, चाकू व कोयते होते. रितेश आरडाओरड करून गल्लीतील लोकांना बोलावत होता. ते सर्व जण त्यास ओढत नेत असताना मारहाण करत होते. ऋतिक ऊर्फ छोटू चव्हाण व आदी जयवीर टाक यांनी सुमितला छातीला डाव्या बाजूला गळ्याजवळ व पाठीवर चाकूने मारून गंभीर जखमी केले. सुमित रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळला. गल्लीतील लोक आल्याने ते सर्व जण पळून गेले. काशिनाथ जावळे यांनी सुमितला मोटारसायकलवर मध्ये बसवून घाटी रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून आज, १५ ऑक्‍टोबरला मृत घोषित केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला!

Latest News

छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला! छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वांत क्रूर हत्‍याकांड घडवणाऱ्या कुख्यात बबला टोळीचा सदस्य शेख अमजद असद...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update 
शिवसेनेचा शिंदे गट, शिंदे गटातही दोन गट, मंत्री शिरसाट- आ. जैस्वाल यांच्यात धुसफूस?
सुसाट कंटेनरने घेतला युवकाचा बळी, चिकलठाणा आठवडे बाजारसमोर अंगावर शहारे आणणारा अपघात, साताऱ्यातही जेसीबीची ९ वर्षीय चिमुकल्याला धडक
गंगापूर पोलीस ठाण्याचे आवार बनले राजकीय कुस्तीचा ‘आखाडा’!; निवडणुकीतील धुसफुसीतून दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांनी लाठीमार करून पांगवली गर्दी 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software